Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा.ईव्ही ने ईव्‍हीची किंमत जवळपास १.२ लाख रूपयांनी कमी केली

टाटा.ईव्ही ने ईव्‍हीची किंमत जवळपास १.२ लाख रूपयांनी कमी केली

मुंबई, फेब्रुवारी १३, २०२४: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) ही टाटा मोटर्सची उपकंपनी आणि भारतातील ईव्‍ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने आज त्‍यांच्‍या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ईव्‍ही नेक्सॉन.ईव्ही आणि टियागो.ईव्ही च्‍या किमतींमधील आकर्षक घटची घोषणा केली, ज्‍यामागे ईव्‍ही अधिकाधिक भारतीय ग्राहकांना उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे.

कपात करण्‍यात आलेल्‍या किमतीची प्रमुख वैशिष्‍ट्ये:

• भारतातील सर्वात वैशिष्‍ट्य संपन्‍न ईव्‍ही नेक्सॉन.ईव्ही च्‍या किमतीमध्‍ये जवळपास १.२ लाख रूपयांची घट झाली आहे.

• भारतातील गतीशीलपणे विक्री होणारी ईव्‍ही टियागो.ईव्ही च्‍या किंमतीमध्‍ये जवळपास ७०,००० रूपयंाची घट झाली आहे, ज्‍यामुळे बेस मॉडेलची किंमत ७.९९ लाख रूपयांपासून सुरू होते.

• नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या पंच .ईव्‍ही च्‍या सुरूवातीच्‍या किमतींमध्‍ये कोणताच बदल झालेला नाही, कारण ते आधीच नजीकच्या भविष्यात बॅटरीच्या किमतीत घट होण्यास कारणीभूत आहेत.

किमतीमधील या कपातीबाबत मत व्‍यक्‍त करत टीपीईएमचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, ”ईव्‍हीच्‍या एकूण किमतीमध्‍ये बॅटरी खर्चांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. नजीकच्‍या काळात बॅटरी सेल किमती स्थिर होण्‍यासह भविष्‍यात त्‍यांच्‍या किमतींमध्‍ये संभाव्‍य कपात पाहता आम्‍ही ग्राहकांना फायदे देण्‍याचे सक्रिय पाऊल उचलले आहे.

ईव्‍हींमध्‍ये गेल्‍या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असताना आमची ईव्‍हींना देशभरात अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देत त्‍यांच्‍या अवलंबतेला चालना देण्‍याची मिशन आहे. आमचा पोर्टफोलिओ व्‍यापक बॉडी स्‍टाइल्‍स, श्रेणी आणि आमच्‍या स्‍मार्ट, वैशिष्‍ट्य संपन्‍न ईव्‍हींसाठी आकर्षक किंमत देतो. आमचा विश्‍वास आहे की या किफायतशीर किंमतीसह नेक्सॉन.ईव्ही आणि टियागो.ईव्ही अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी अधिक लक्षवेधक तत्त्व बनतील.”

ईव्हीने प्रबळ विकास गती दाखवली आहे आणि एकूण प्रवासी वाहन उद्योग विकासामध्‍ये मोठे योगदान देत आहेत. कॅलेंडर वर्ष २०२३ मध्‍ये ईव्‍ही विभागाने पीव्‍ही उद्योगाने नोंद केलेल्‍या ८ टक्‍के वाढीच्‍या तुलनेत ९० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ केली. ही विकासगती कॅलेंडर वर्ष २०२४ मध्‍ये देखील सुरू आहे, जेथे ईव्‍ही विक्रीने जानेवारी २०२४ मध्‍ये वार्षिक १०० टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली. टीपीईएम ७० टक्‍क्‍यांहून अधिक बाजारपेठ हिस्‍सासह या झपाट्याने विकसित होणाऱ्या विभागात मार्केट लीडर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments