पुणे दि.14 :- मंचर नगरपंचायतीच्यावतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राबविण्यात आलेले विविध देशभक्तीपर व जनजागृतीचे उपक्रम उत्साहात पार पडले असून शहरातील 3 हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतल्याची असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
पंचवटी उद्यानामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यामध्ये महिला बचत गट, कर्मचारी,अधिकारी तसेच स्थानिक नागरिक असे एकूण 150 नागरिकांनी सहभाग नोंदविला. महात्मा गांधी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये तिरंगा राखी निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 300 विद्यार्थ्यांना अभियानाबाबत माहिती देण्यासह देशभक्ती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
नगरपंचायत व संत ज्ञानेश्वर सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली तसेच हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद शाळा मोरडेवाडी येथे ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा-हर घर स्वच्छता मोहिमेअंतर्गत शपथ देण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी तसेच नागरिक असे एकूण 750 जणांनी सहभाग घेतला.
नगरपंचायत कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.तसेच अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थी ग्रुपने शपथ घेऊन ध्वजारोहण करून 15 ऑगस्ट 2025 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थी,शिक्षक,नगरपंचायत कर्मचारी,अधिकारी तसेच नागरिक असे एकूण 850 सहभाग घेतला.
हर घर तिरंगा-2025″ आणि “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता”अभियानांतर्गत मंचर शहरात घेतलेले हे विविध उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे ठरले आहेत, अशी माहिती श्री. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


