Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री महालक्ष्मी मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त 'ब्रह्मोत्सव'* *श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग...

श्री महालक्ष्मी मंदिराच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘ब्रह्मोत्सव’* *श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; तीन दिवसीय उत्सवाचे आयोजन ; शालेय गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम*

पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान मंदिरात हा उत्सव होणार असून त्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पुण्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली.

राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिक कार्यक्रमामध्ये होम-हवन, महाअभिषेक, अर्चना, पालखी सोहळा व फुलांची होळी तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी मदत व उत्सव मूर्तीची धान्यतुला करुन ते धान्य अनाथ मुलांच्या संस्थेस वाटप अशा उपक्रमांचा समावेश आहे.

ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, उत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवार,दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मंदिरात गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना होणार आहे. गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता १०८ कलश अभिषेक होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू या उत्सवमूर्तींची धान्य व पुस्तकतुला होणार असून हे साहित्य गरजूंना देण्यात येणार आहे. रात्री ८.३० वाजता सुवर्ण कमल आणि रजत कमल अर्चना म्हणजेच उत्सवमूर्तींना सोन्याची व चांदीची फुले अर्पण करण्यात येतील.

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता केशर दूध अभिषेक, सकाळी ११.३० वाजता विविध शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम व सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देवीच्या उत्सवमूर्तींची पालखी प्रदक्षिणा मंदिर परिसरात होणार आहे. तर, सायंकाळी ७.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments