Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedयूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे सेबीकडे 800 कोटी रु. च्या आयपीओसाठी डीआरएचपी सादर

यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे सेबीकडे 800 कोटी रु. च्या आयपीओसाठी डीआरएचपी सादर

प्रॉडक्ट डिझाइन, प्रोटोटायपिंग आणि इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उत्पादने व सोल्युशन्सच्या उत्पादनामध्ये एंड-टू-एंड क्षमतेसह इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (“EMS”) पुरवठादार कंपनी यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) सादर केला आहे.

 

 

 

कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीतून एकूण 8000 दशलक्ष रु. [800 कोटी रु.] पर्यंत इक्विटी शेअर्सच्या ऑफरद्वारे निधी उभारण्याचे नियोजन केले आहे.

 

 

 

या ऑफरमध्ये 4000 दशलक्ष रु. [400 कोटी रु.] पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“Fresh Issue”) तसेच विक्री समभागधारकांकडून 4000 दशलक्ष रु. [400 कोटी रु.] पर्यंतच्या शेअर्सची ऑफर फॉर सेल (“Offer for Sale”) समाविष्ट आहे. कंपनी कर्मचारी राखीव भागातून बोली लावणाऱ्या पात्र कर्मचार्‍यांना ऑफर किंमतीवर सवलत देऊ शकते.

 

 

 

कंपनी थेट निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील गोष्टींसाठी करणार आहे: (i) काही उर्वरित कर्जाचे पूर्वभरण किंवा अंशतः/संपूर्ण परतफेड; (ii) विद्यमान उत्पादन सुविधा यासाठी प्रकल्प आणि यंत्रांची खरेदी आणि (iii) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी.

 

 

 

यूकेबी इलेक्ट्रॉनिक्स ही भारतातील मोजक्या स्वदेशी कंपन्यांपैकी एक असून उत्पादनाच्या डिझाइनपासून उत्पादनापर्यंतच्या संपूर्ण लाइफसायकलला कव्हर करण्याची कंपनीची क्षमता आहे. कंपनी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस आणि संरक्षण, मास ट्रान्सपोर्टेशन, ऑटोमोबाईल (इ-मोबिलिटी सहित), इंडस्ट्रियल आणि रिन्युएबल सेगमेंटमध्ये कार्यरत आहे. कंपनी ही भारतातील अग्रगण्य उत्पादकांपैकी एक असून इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, असेंब्ली कॉर्ड्स, PCBAs, इ-मोबिलिटी चार्जिंग सोल्युशन्सचे उत्पादन करण्याची एंड-टू-एंड क्षमता आहे. विविध उत्पादन पोर्टफोलिओमुळे कंपनीला B2B2C आणि B2B2B मार्केट्सना सेवा पुरवता आली आहे. कंपनीकडे 170 जागतिक उत्पादन सर्टिफिकेशन्स असून कंपनी 17 देशांमध्ये उत्पादने निर्यात करते. कंपनीकडे पुणे (महाराष्ट्र), अहमदनगर (महाराष्ट्र), नोएडा (उत्तर प्रदेश), घिलोठ (राजस्थान), गोवा, श्री सिटी (आंध्र प्रदेश) आणि चेन्नई (तामिळनाडू) येथे 11 मोक्याच्या ठिकाणी स्थापन केलेली उत्पादन सुविधा केंद्रे आहेत.

 

 

 

कंपनी फॉर्च्यून 500 कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी अग्रगण्य ओरिजिनल इक्वीपमेंट मन्युफक्चरर (“OEMs”) ना सेवा पुरवते. यामध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेड, पॅनासॉनिक अप्लायंसेस इंडिया कंपनी लिमिटेड, कॅरिअर मिडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हेयर अप्लायंसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.

 

 

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मार्फत ऑफर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. (“लिस्टिंग डीटेल्स”)

 

 

 

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments