Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedबेण्‍टली सिस्‍टम्‍सने पुण्‍यातील शैक्षणिक सहयोगांचा विस्‍तार केला डिजिटल इंजीनिअरिंग शिक्षणाला...

बेण्‍टली सिस्‍टम्‍सने पुण्‍यातील शैक्षणिक सहयोगांचा विस्‍तार केला डिजिटल इंजीनिअरिंग शिक्षणाला प्रगत करण्‍यासाठी सिम्‍बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि सीओईपी टेक्‍नॉलॉजिकल युनिव्‍हर्सिटीसोबत सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी केली

पुणे, डिसेंबर 17, 2025 – बेण्‍टली सिस्‍टम्‍स, इन्‍कॉर्पोरेटेड (नॅसडॅक: बीएसवाय) या इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर इंजीनिअरिंग सॉफ्टवेअर कंपनीने आज भारतातील डिजिटल इंजीनिअरिंग शिक्षण व संशोधन अधिक प्रगत करण्‍यासाठी सिम्‍बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एसआयटी), पुणे आणि सीओईपी टेक्‍नॉलॉजिकल युनिव्‍हर्सिटी यांच्‍यासोबत सामंजस्‍य करारांवर (एमओयू) स्‍वाक्षरी करण्‍याची घोषणा केली.

 

बेण्‍टलीने प्रत्‍येक कॅम्‍पसमध्‍ये सेंटर ऑफ इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर इनोव्‍हेशन स्‍थापित करण्‍यासाठी एसआयटी आणि सीओईपी टेक्‍नॉलॉजिकल युनिव्‍हर्सिटीसोबत सहयोग केला आहे. ही समर्पित केंद्रे एआय व डिजिटल ट्विन तंत्रज्ञानांचा वापर करत शाश्वत पायाभूत सुविधा डिझाइन, डिजिटल बांधकाम आणि मालमत्ता जीवनचक्र व्‍यवस्‍थापनामध्‍ये प्रगत शिक्षण व संशोधनावर लक्ष केंद्रित करतील. विद्यार्थी व प्राध्‍यापकांना बेण्‍टलीच्‍या उद्योग-अग्रणी सॉफ्टवेअरचा प्रत्‍यक्ष अनुभव मिळेल, ज्‍यामध्‍ये मायक्रोस्‍टेशन, ओपनरोड्स व ओपनफ्लोज, तसेच जगभरातील अभियांत्रिकी व्‍यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अवलंबलेल्‍या इतर बेण्‍टली सॉफ्टवेअर टूल्‍सचा समावेश असेल.

 

तसेच, बेण्‍टली एसआयटी व सीओईपी टेक्‍नॉलॉजिकल युनिव्‍हर्सिटी यांच्‍यासोबत काम करत अभ्‍यासक्रमाला प्रगत करेल आणि बेण्‍टली एज्‍युकेशनच्‍या माध्‍यमातून अनुभवात्‍मक अध्‍ययन उपक्रमांचा विस्‍तार करेल. विद्यार्थ्‍यांना जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी संलग्‍न असलेले संरचित अध्‍ययन मॉड्यूल्‍स, प्रमाणन आणि प्रकल्‍प-आधारित प्रशिक्षणामधून फायदा होईल, ज्‍यासह ते झपाट्याने विकसित होत असलेल्‍या पायाभूत सुविधा क्षेत्रात उज्‍ज्‍वल करिअर घडवण्‍यास सक्षम होतील.

 

बेण्‍टली सिस्‍टम्‍सचे दक्षिण आशियामधील प्रादेशिक कार्यकारी कमलकन्‍नन थिरूवदी म्हणाले, ”सिम्‍बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि सीओईपी टेक्‍नॉलॉजिकल युनिव्‍हर्सिटी यांच्‍यासोबत आमच्‍या सहयोगामधून भारतातील भावी इंजीनिअर्सना सक्षम करण्‍याप्रती बेण्‍टलीची कटिबद्धता दिसून येते. जागतिक दर्जाचे डिजिटल तंत्रज्ञान आणि अनुभवात्‍मक अध्‍ययन संधी उपलब्‍ध करून देत आमचा नवप्रवर्तकांना निपुण करण्‍याचा मनसुबा आहे, जे शाश्वत व सर्वोत्तम डिझाइन, बांधकाम व कार्यसंचालनांच्‍या माध्‍यमातून भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणू शकतील.”

 

सिम्‍बायोसिस इंटरनॅशनल (डीम्‍ड युनिव्‍हर्सिटी)चे संस्‍थापक व चान्‍सलर प्रो. (डॉ.) एस. बी. मुजुमदार म्‍हणाले, ”सेंटर ऑफ इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर इनोव्‍हेशन शैक्षणिक संस्‍था आणि उद्योगामधील तफावत दूर करण्‍यासठी उत्‍प्रेरक म्‍हणून सेवा देईल. बेण्‍टली सिस्‍टम्‍ससोबत या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमच्‍या विद्यार्थ्‍यांना जागतिक स्‍तरावर अवलंण्‍यात आलेले टूल्‍स व तंत्रज्ञानांबाबत व्‍यावहारिक अनुभव मिळेल, ज्‍यासह ते पायाभूत सुविधा डिझाइन व व्‍यवस्‍थापनामधील वास्‍तविक आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी सक्षम होतील.”

 

सीओईपी टेक्‍नॉलॉजिकल युनिव्‍हर्सिटीचे रजिस्‍ट्रार (कुलसचिव) डॉ. डी. एन. सोनावणे म्‍हणाले, ”बेण्‍टली सिस्‍टम्‍ससोबत सहयोग आमच्‍या अभ्‍यासक्रमामध्‍ये अधिक भर करेल, तसेच विद्यार्थ्‍यांना अत्‍याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानांचा प्रत्‍यक्ष अनुभव देईल. हा सहयोग खात्री देतो की, आमचे पदवीधर तंत्रज्ञान-संचालित पायाभूत सुविधा उद्योगामध्‍ये प्रगती करण्‍यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये व मानसिकतेसह सुसज्‍ज असतील.”

 

हे उपक्रम भारताच्‍या विकसित भारत २०४७ दृष्टिकोनाशी, तसेच पायाभूत सुविधा व्यावसायिकांच्‍या भावी पिढीला सक्षम करण्‍याप्रती बेण्‍टलीच्‍या व्‍यापक मिशनशी संलग्‍न आहेत, ज्‍यामधून देशभरात शाश्वत, तंत्रज्ञान-संचालित पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्‍याची क्षमता असलेला कर्मचारीवर्ग घडेल.

 

जागतिक स्‍तरावर बेण्‍टली एज्‍युकेशन आघाडीच्‍या युनिव्‍हर्सिटीजसोबत सहयोग करत संरचित अध्‍ययन उपक्रम, प्रमाणन आणि प्रकल्‍प-आधारित प्रशिक्षण देत आहे, जे विद्यार्थ्‍यांना डिजिटल पायाभूत सुविधेमध्‍ये करिअर घडवण्‍यास सुसज्‍ज करतात. भारतात, या जागतिक सर्वोत्तम पद्धती अभ्‍यासक्रम एकीकरण, फॅकल्‍टी सुसज्जता व सहयोगात्‍मक संशोधन यांसारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून स्‍थानिक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात येतील, ज्‍यासह विद्यार्थ्‍यांना आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील अनुभव आणि प्रादेशिक-आधारित कौशल्‍ये

मिळतील.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments