Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील सर्वात मोठे ख्रिसमस सेलिब्रेशन फिनिक्स मार्केटसिटी विमाननगर येथे ‘ख्रिसमस वंडरलँड 2.0’...

पुण्यातील सर्वात मोठे ख्रिसमस सेलिब्रेशन फिनिक्स मार्केटसिटी विमाननगर येथे ‘ख्रिसमस वंडरलँड 2.0’ मध्ये साजरा होत आहे.

 

फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे सणासुदीचा आनंद दुप्पटीने वाढवण्यासाठी मॉलमध्ये नटक्रॅकर्स, मंत्रमुग्ध करणारे संगीतात्मक थीम्स ने सजलेल्या भव्य ख्रिसमस ट्रीसह सजावट करण्यात आली आहे, जी संपूर्ण वातावरणाला उत्साही आणि आनंददायी सणाचा अनुभव देते.

मॉलचे लिबर्टी स्क्वेअर ‘फिनिक्स ख्रिसमस वंडरलँड 2.0’ मध्ये रूपांतरित झाले असून, झगमगत्या इमर्सिव्ह टनेलमधून प्रवेश करताच आपले स्वागत रंगीबेरंगी आणि उत्साही दुनियेत होते. येथे कँडीने सजवलेले ख्रिसमस ट्री, युरोपियन थीमवरील शॅलेट्स तसेच आकर्षक भेटवस्तू, ख्रिसमस ट्रीट्स आणि कलेक्टिबल्स देणारे फेस्टिव्ह स्टॉल्स अनुभवायला मिळतील. यासोबतच पुण्यातील सर्वात उंच टेडी बेअर यासारख्या इन्स्टा-फोटोसाठी इंस्टॉलेशन्सही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील.

या वर्षातील प्रमुख आकर्षण म्हणजे फिनलंडहून आलेला सांता, ज्याशी आपल्याला संवाद साधण्याची व अविस्मरणीय छायाचित्रे टिपण्याची संधी मिळणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय आणि अस्सल ख्रिसमसचा अनुभव मिळतो. वंडरलँडमध्ये लाईव्ह म्युझिक, कॅरोल सिंगिंग आणि नियोजित सादरीकरणांसह एक भव्य फेस्टिव्ह परफॉर्मन्स स्टेजही असणार असून, संध्याकापासून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होईल.

कुटुंब आणि लहान मुलांसाठी टाइम झोन, फन सिटी, आणि हॅम्लीज यांसारखे गेमिंग व क्रिएटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी झोन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत, जे कार्यक्रमात उत्साह निर्माण करतात. याशिवाय थीम्ड मॅस्कॉट्स, कॅरिकेचर आर्टिस्ट्स आणि टॅटू आर्ट स्टेशन्स यांसारखी अतिरिक्त आकर्षणे सर्व वयोगटातील लोकांसाठी मनोरंजनाची हमी देतात.

उद्घाटनप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना, फिनिक्स मॉल्स [पुणे] चे सीनियर सेंटर डायरेक्टर अंशुमन भारद्वाज म्हणाले, “फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे आमचा भर हा केवळ खरेदीपुरता मर्यादित न राहता, रंजक अनुभव अधिक समृद्ध व अविस्मरणीय बनवण्यावर आहे. लिबर्टी स्क्वेअरमधील ‘फिनिक्स ख्रिसमस वंडरलँड 2.0’ मध्ये सजावट, मनोरंजन आणि इंटरअ‍ॅक्टिव्ह अनुभव यांचा संगम असून, कुटुंबीय व मित्रांसोबत सण साजरा करण्याचा हा एक आनंददायी अनुभव ठरेल.”

कार्यक्रमाची माहिती

दिनांक: 12 ते 28 डिसेंबर 2025

स्थळ: लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी पुणे

वेळ: सायंकाळी 5.00 वाजल्यापासून

तिकीट दर: रु.299 पासून

बुकिंग लिंक: https://tinyurl.com/PhoenixChristmasWonderland

फिनिक्स मार्केटसिटी पुणे बद्दल

फिनिक्स मार्केटसिटी पुणे हे शहरातील एक प्रीमियम लाईफस्टाईल डेस्टिनेशन असून, येथे जागतिक दर्जाची खरेदी, भोजन, मनोरंजन आणि सांस्कृतिक अनुभव एकत्र अनुभवता येतात. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ब्रँड्सचे वैविध्यपूर्ण मिश्रण, आकर्षक कार्यक्रम आणि इमर्सिव्ह अनुभवांमुळे हे पुणे आणि लगतच्या शहरांसाठी फॅशन मनोरंजन आणि जागतिक मेजवानीचे आवडते ठिकाण ठरत आहे.

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments