पुणे,23 डिसेंबर 2025 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर ने अवयव प्रत्यारोपण सेवांमध्ये विस्तार केला असून नुकतेच यकृत प्रत्यारोपण सेवा सुरू केली आहे.याला बहुशाखीय सुविधा,कुशल शल्यचिकित्सक, हेपॅटोलॉजिस्टस्, भूलतज्ञ, रेडिओलॉजिस्टस् व इतर आरोग्य सेवा सहाय्यकांचे पाठबळ आहे. ही कुशल टीम रूग्णांच्या आजाराच्या निदानापासून ते प्रत्यारोपणानंतरच्या पाठपुराव्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी एकत्रितपणे काम करतात.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की,पुढील टप्प्यातील यकृत आजार असणाऱ्या रूग्णांसाठी यकृत प्रत्यारोपण हा एक अत्यंत महत्त्वाचा पर्याय आहे.एकीकडे प्रत्यारोपणाच्या यशाचे प्रमाण वाढत असताना लोकांमध्ये देखील जागरूकता आणि या प्रक्रियांबाबत आत्मविश्वास निर्माण होत आहे.उपचार पध्दती लक्षणीयरित्या प्रगत होत असल्या तरी अवयवदाते आणि अवयवाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या रूग्णांमधील दरी ही मोठी आहे,म्हणूनच ही सुविधा पुण्यातील पूर्व भाग आणि महाराष्ट्रभरातील येणाऱ्या रूग्णांसाठी सोयीस्कर ठरेल.या सुविधेबरोबरच यकृत आजार असलेल्या रूग्णांसाठी लिव्हर ओपीडी देखील सुरू करण्यात आली आहे.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर चे समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे म्हणाले की,अवयवदान आणि प्रत्यारोपणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रूग्णालयातर्फे आजवर विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. विविध कार्यक्रमात भाग घेत तसेच नागरिकांशी संवाद साधत जागरूकता निर्माण करण्यामध्ये नोबल हॉस्पिटल नेहमीच अग्रेसर राहिले आहे.नुकतेच गणेशोत्सवादरम्यान नोबल हॉस्पिटल्स मधील तब्बल 400 कर्मचाऱ्यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा विक्रमी वेळेत केली.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,दात्याच्या शरीरातून अवयव काढणे आणि ते रूग्णामध्ये प्रत्यारोपित करणे ही एक व्यापक पण वेळेच्या मर्यादेमध्ये पूर्ण करावी लागणारी प्रक्रिया आहे.यासाठी बहुशाखीय टीमच्या निरंतर प्रयत्नांची गरज असते आणि हेच आम्ही मुत्रपिंड प्रत्यारोपणाबाबत करत आलो आहोत.आता यकृत प्रत्यारोपण सुरू झाल्यामुळे अनेक रूग्णांना येथे सेवा मिळेल.कठोर जागतिक मानकांचे आमच्या प्रक्रियांमध्ये एकत्रीकरण करून रूग्णसुरक्षेला प्राधान्य देत उत्तम परिणाम साधण्याचा आम्ही निरंतर प्रयत्न करत आहो
त.


