Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedफिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे प्रगत ह्यूमन मिल्क बँक आणि NICU...

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे प्रगत ह्यूमन मिल्क बँक आणि NICU सहाय्य यांच्या माध्यमातून पुण्यात नवजात शिशुसंगोपन सेवांना बळकटी

 

पुणे, 24 डिसेंबर 2025: फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (FIL) आणि त्यांची सीएसआर शाखा असलेल्या मुकुल माधव फाउंडेशन (MMF) ने आज पुण्यातील भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (BHRC) येथे प्रगत ह्यूमन मिल्क बँकेचे उद्घाटन केले. या उपक्रमाद्वारे माता व बाल आरोग्यासाठीच्या त्यांच्या दीर्घकालीन बांधिलकीला अधिक बळ मिळाले आहे. नव्या पाश्चरायझेशन मशीनसह अत्यावश्यक मिल्क बँकिंग उपकरणे कार्यान्वीत केल्यामुळे विशेषतः अकाली जन्मलेली आणि गंभीर आजारी नवजात शिशु यांना जीवनाच्या अत्यंत महत्त्वाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुरक्षित, पाश्चराइज्ड दान केलेले स्तनदूध (ब्रेस्ट मिल्क) उपलब्ध करून देण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

 

 

 

या प्रगत सुविधेचे उद्घाटन वैद्यकीय व संस्थात्मक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यामध्ये भारती विद्यापीठच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप; भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणेचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवानी, थॅलेसेमिया सोसायटी ऑफ पुणे चॅप्टर (TSPC) च्या पॅट्रन तसेच चार दशकांहून अधिक काळ थॅलेसेमिया क्षेत्रातील अग्रणी सौ. जस्मिन मजेठिया आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जितेंद्र ओसवाल यांचा समावेश होता. या मान्यवरांनी नवजात शिशु सेवांच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी आणि उच्च जोखमीच्या बाळांसाठी परिणाम सुधारण्यासाठी उद्योग–आरोग्यसेवा भागीदारीचे सातत्यपूर्ण महत्त्व अधोरेखित केले.

 

 

 

फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सीएसआर उपक्रमांतर्गत, मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाइप्स यांनी BHRC येथील ह्यूमन मिल्क बँकेसाठी अत्यावश्यक उपकरणे दान केली आहेत. त्यामुळे दान करण्यात आलेले स्तनदूध सुरक्षितपणे संकलित करणे, प्रक्रिया करणे, साठवणे आणि वितरण करण्याची क्षमताही अधिक मजबूत झाली आहे. ही मदत मुदतीपूर्वी, अकाली जन्मलेल्या आणि गंभीर आजारी नवजात शिशुंसाठी सर्वोत्तम पोषण सुनिश्चित करण्यात तसेच त्यांच्या वाचण्याच्या आणि तब्बेतीत सुधारणा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

 

या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना हे दान म्हणजे कॉर्पोरेट भागीदारांच्या माता व बाल आरोग्यासाठीच्या सखोल बांधिलकीचे प्रतीक आहे आणि रुग्णालयातील नवजात शिशु सेवांवर याचा दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव पडेल असे डॉ. अस्मिता जगताप आणि डॉ. संजय ललवानी यांनी नमूद केले.

 

BHRC येथील ह्यूमन मिल्क बँक मार्च 2022 पासून कार्यरत असून, मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाइप्स यांच्या योगदानातून तिची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत या सुविधेमुळे 2,200 हून अधिक नाजूक आणि आजारी नवजात शिशूंना लाभ झाला असून, सुमारे 1,900 मातांकडून संकलित केलेल्या 1,500 लिटरपेक्षा अधिक दान केलेल्या स्तनदुधाचे वितरण करण्यात आले आहे. नवीन अत्याधुनिक उपकरणांनंतर ही सुविधा मातांचे दूध उपलब्ध न होऊ शकणाऱ्या शिशूंसाठी एक अत्यावश्यक जीवनरेषा म्हणून कार्य करत राहील आणि त्यांच्या निरोगी वाढीस, विकासास व जगण्यास पाठबळ देईल.

 

 

 

भारती रुग्णालयाव्यतिरिक्त, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन सध्या भारती हॉस्पिटल, एएफएमसी कमांड हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटल अशा पुण्यातील तीन प्रमुख ह्यूमन मिल्क बँकांना सहाय्य करत आहे. या केंद्रांची एकत्रित क्षमता 9.5 लिटर असून, त्यापैकी भारती हॉस्पिटल 3.5 लिटर, तर एएफएमसी आणि केईएम हॉस्पिटल प्रत्येकी 3 लिटर क्षमतेने कार्यरत आहेत. BHRC येथील मजबूत पायाभूत सुविधांमुळे शहरातील विशेष नवजात बालकांच्या पोषणाच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या नेटवर्कची क्षमता आणखी वाढली आहे.

 

 

 

ह्यूमन मिल्क बँकिंग उपक्रमांच्या जोडीला फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी नवजात बालक अतिदक्षता विभागा(NICU) च्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी सातत्याने गुंतवणूक केली आहे. ससून हॉस्पिटलमध्ये, इतर भागीदारांनी दिलेल्या ह्यूमन मिल्क बँकेसाठी आवश्यक असलेली संपूर्ण बाह्य पायाभूत सुविधा मुकुल माधव फाउंडेशनने उभारली असून त्यामुळे ही सुविधा पूर्णतः कार्यान्वित होऊन गरजू कुटुंबांसाठी सुलभ झाली आहे.

 

 

 

पाश्चराइज्ड दान केलेले स्तनदूध हे जन्मतः कमी वजन असलेल्या आणि अकाली जन्मलेल्या शिशूंकरिता वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित पोषकअन्न आहे. फॉर्म्युला फीडिंगच्या तुलनेत यामुळे संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो, तब्बेतीत सुधारणा जलद होते आणि निरोगी वाढ व विकासास चालना मिळते. सुरक्षितता सुनिश्चित करताना आवश्यक पोषक घटक जपून ठेवण्यासाठी हे दूध प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिक आणि स्तनपान सल्लागारांकडून काटेकोर तपासणी व पाश्चरायझेशन प्रक्रियेतून जाते.

 

 

 

या उपक्रमाबद्दल बोलताना मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु छाब्रिया म्हणाल्या: “दान केलेल्या दुधाचा प्रत्येक थेंब म्हणजे एका आईची तिच्या स्वतःच्या बाळापलीकडे पोहोचलेली ममता असते. पुण्यातील ह्यूमन मिल्क बँकांना बळकटी देऊन, आम्ही केवळ अकाली आणि वैद्यकीयदृष्ट्या नाजूक शिशूंना अत्यावश्यक पोषणच देत नाही, तर अत्यंत संवेदनशील काळात कुटुंबांना दिलासा देखील देतो. फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे, कोणत्याही नवजात शिशूला सुरक्षित, जीवनदायी पोषणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दर्जेदार नवजात शिशु सेवा हा विशेषाधिकार नव्हे तर हक्कच असावा अशी आमची भावना असून एकत्र येऊन, त्या विश्वासाला समर्थ ठरणारी यंत्रणा आम्ही उभारत आहोत.”

 

 

 

या सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन पुण्याच्या आरोग्यसेवा परिसंस्थेला अधिक मजबूत करत आहेत आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणांमध्ये रुग्णालये, काळजीवाहक

आणि कुटुंबांना पाठबळ देत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments