Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिम्बायोटेक फार्मालॅब लिमिटेडतर्फे 2,180 कोटी रु. पर्यंतच्या आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

सिम्बायोटेक फार्मालॅब लिमिटेडतर्फे 2,180 कोटी रु. पर्यंतच्या आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

ऑर्गनिक रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि गुंतागुंतीची इंजेक्टेबल्स अशा तीन प्लॅटफॉर्मवर कार्यक्षमता असलेली संशोधन व विकासावर आधारित, विज्ञानाधिष्ठित औषधनिर्माण व जैवतंत्रज्ञान कंपनी सिम्बायोटेक फार्मालॅब लिमिटेड (“कंपनी”) ने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”) यांच्याकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी”) दाखल केला आहे.

 

 

 

कंपनी इक्विटी शेअर्सच्या (प्रति शेअर दर्शनी मूल्य 2 रु.) प्राथमिक समभाग विक्रीद्वारे एकूण 2,180 कोटी रु. पर्यंत निधी उभारण्याची योजना आखत आहे. या ऑफरमध्ये 150 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि विक्री समभागधारकांकडून 2,030 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्री ऑफर (“ऑफर फॉर सेल”) यांचा समावेश आहे.

 

 

 

कंपनी निव्वळ उत्पन्नातून उभारलेला निधी (अ.) कंपनीने घेतलेल्या काही प्रलंबित कर्जांच्या संपूर्ण किंवा अंशतः आगाऊ परतफेडीसाठी आणि/किंवा परतफेडीसाठी तसेच (ब.) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्याची योजना आखत आहे.

 

 

 

सिम्बायोटेक फार्मालॅब लिमिटेडकडे आर्थिक वर्ष 2025 मध्ये संख्यात्मक प्रमाणाच्या दृष्टीने कॉर्टिकोस्टिरॉइड आणि स्टिरॉइडल-हार्मोन सक्रिय औषधी घटक (“एपीआय”) क्षेत्रात जागतिक अग्रणी स्थान आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कॉर्टिकोस्टिरॉइड एपीआयमध्ये 36.2% आणि स्टिरॉइडल-हार्मोन एपीआयमध्ये 44.2% असा जागतिक प्रमाणात्मक बाजारपेठीय हिस्सा कंपनीकडे आहे. (स्रोत: एफ अँड एस अहवाल). आर्थिक वर्ष 2025 मध्ये आघाडीच्या 10 कॉर्टिकोस्टिरॉइड आणि स्टिरॉइडल-हार्मोन एपीआयमध्ये स्थान असलेली ही एकमेव भारतीय तसेच जागतिक कंपनी आहे (स्रोत: एफ अँड एस अहवाल). त्यातून कंपनीच्या पोर्टफोलिओची सखोलता दिसून येते. कंपनी ही उत्पादने फर्मेटेंशन प्रक्रिया आणि बहुस्तरीय गुंतागुंतीच्या रासायनिक अभिक्रियांद्वारे तयार करते. 30 पेक्षा अधिक वर्षांचा उद्योगातील अनुभव असलेल्या सिम्बायोटेक फार्मालॅबने 1995 मध्ये प्रयोगशाळा स्तरावरील स्टिरॉइडल-हार्मोन एपीआय उत्पादकापासून सुरुवात करून आज युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (“यूएस एफडीए”), युरोपियन युनियन गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (“ईयू-जीएमपी”), कोरियाचे अन्न व औषध सुरक्षा मंत्रालय तसेच इतर जागतिक संस्थांकडून मान्यता प्राप्त असलेल्या औद्योगिक स्तरावरील, बॅकवर्ड-इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर केले आहे.

 

 

 

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

 

 

 

जेएम फायनान्शियल लिमिटेड, अव्हेन्डस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अ‍ॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments