Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचडीएफसी बँक परिवर्तन तर्फे कॅन्सर विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई मॅरेथॉन २०२६...

एचडीएफसी बँक परिवर्तन तर्फे कॅन्सर विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये उतरवणार सर्वात मोठी कॉर्पोरेट टीम

इंडियन कॅन्सर सोसायटीच्या मदतीसाठी बँकेचे जवळजवळ १५०० कर्मचारी स्वयंसेवक म्हणून धावणार

 

 

 

एचडीएफसी बँकेच्या सीएसआर उपक्रम असलेल्या परिवर्तन अंतर्गत मुंबईत दिनांक १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या टाटा मॅरेथॉन २०२६ मध्ये त्यांचे जवळजवळ १५०० कर्मचारी सहभागी होणार असून या अंतर्गत ते कॅन्सर आणि त्याच्या लवकर निदानाविषयी जागरुकता निर्माण करणार आहेत. यासाठी बँकेने इंडियन कॅन्सर सोसायटी (आयसीएस) या कॅन्सर विषयी काम करणार्‍या भारतातील सर्वात जुन्या सामाजिक संस्थे बरोबर सहकार्य केले आहे.

 

 

 

एचडीएफसी बँक परिवर्तन अंतर्गत येणार्‍या त्यांच्या हायजिन पिलर अंतर्गत प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपचार, आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विकास आणि समाजात आरोग्य विषयक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. टाटा मुंबई मॅरेथॉन मधील आयसीएस बरोबरच्या भागीदारी मुळे कॅन्सरचे लवकर निदान केल्याने तो पूर्ण बरा होऊ शकतो या विषयी जागरुकता निर्माण होणार आहे.

 

 

 

या सहकार्यामुळे एचडीएफसी बँक परिवर्तनच्या सामाजिक आरोग्या विषयी सर्वसमावेशनाला प्रोत्साहन मिळेल. या मॅरेथॉनचा एक भाग म्हणून आयसीएस तर्फे त्यांचा कॅन्सर पासून मुक्ती मिळालेले रुग्ण आणि आयसीएसचे कर्मचारी असा १०० हून अधिक धावकांचा संघही सहभागी होणार आहे.

 

या मॅरेथॉन विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. कैझाद भरुचा यांनी सांगितले “ आम्ही प्रत्येक परिवाराच्या जीवनाला कोणत्या ना कोणत्या कारणाने स्पर्श करण्यासाठी धावत आहोत. एक बँक म्हणून आमची ही जबाबदारी आहे की वित्तीय सेवांच्या पलिकडे जाऊन आम्ही ज्या समाजाला सेवा देतो त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे. इंडियन कॅन्सर सोसायटी बरोबर उभे राहून जागरुकता, लवकर निदान आणि प्रत्येकाने कॅन्सरचा जीवनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी उभे राहिल्याचा आंम्हाला आभिमान वाटतो.”

 

या भागीदारी विषयी बोलतांना इंडियन कॅन्सर सोसायटी च्या मानद कार्यवाह आणि व्यवस्थापकीय विश्वस्त तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर श्रीमती उषा थोरात यांनी सांगितले “ एचडीएफसी बँकेने आंम्हाला केलेले सहकार्य आणि त्यांच्या कर्मचार्‍यांचा इतका मोठा संघ कॅन्सर विषयीच्या आमच्या मोहिमेसाठी दिल्या बद्दल त्यांचे आभारी आहोत. कॅन्सर मुळे भारतातील अनेक कुटूंबांवर परिणाम होत असतो आणि जागरुकते मुळे निष्कर्शात सुधारणा होऊ शकते. अगदी सोप्या तपासणीमुळे लवकर निदान होऊन वाचण्याची शक्यता अधिक असते. तरीही भिती आणि माहिती मुळे निदानास उशीर होतो. कॅन्सरच्या रुग्णांना टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये सहभागी होतांना पाहणे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे धैर्य आणि सकारात्मकता यांमुळे कॅन्सरशी त्यांची लढण्याची आणि त्यापुढे जाण्याची त्यांची उर्जा अधोरेखित होते.”

 

ही भागीदारी अधिक सक्षम करण्यासाठी इंडियन कॅन्सर सोसायटी तर्फे एचडीएफसी बँकेच्या कर्मचार्‍यांसाठी काही निवडक ठिकाणी स्क्रीनिंग कँप्सचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भरुचा यांनी पुढे सांगितले “ एचडीएफसी बँके मध्ये आमचा असा ठाम विश्वास आहे की सक्षम समाज हा आरोग्यपूर्ण जीवनापासून सुरु होतो. आमचे १५०० सहकारी या कार्यासाठी धावणार आहेत याचा मला अभिमान वाटतो. ही संख्या आजपर्यंत मॅरेथॉन मध्ये धावलेली सर्वात मोठी टीम आहे. आमचे कर्मचारी एकत्र येऊन समाजासाठी वचनबध्द होऊन समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत.”

 

 

 

या उपक्रमा व्यतिरिक्त एचडीएफसी बँक परिवर्तन तर्फे संपूर्ण भारतातील आरोग्य उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. कॅन्सर केअर क्षेत्रात बँकेने गुजरात कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल सारख्या संस्थां बरोबर भागीदारी केली आहे.

 

 

 

परिवर्तन हा एचडीएफसी बँकेचा अम्ब्रेला सीएसआर उपक्रम आहे, जो सहा प्रमुख क्षेत्रात कार्यरत आहे. यामध्ये ग्रामीण विकासख्‍ शिक्षणाचा प्रसार, कौशल्य विकास आणि जीवन सुधारणा, आरोग्य आणि स्वच्छता, वित्तीय शिक्षण आणि सर्वसमावेशन आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समावे

श आहे.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments