Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीवायसी एचडीएफसी रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एकूण 194 खेळाडू सहभागी स्पर्धेस...

पीवायसी एचडीएफसी रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एकूण 194 खेळाडू सहभागी स्पर्धेस 6 मार्च पासून प्रारंभ

पुणे, 5 मार्च 2024- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित सातव्या पीवायसी एचडीएफसी बँक रॅकेट लीग स्पर्धेस उद्यापासून ता. सहा पासून प्रारंभ होत असून या 6 संघात मिळून 194 खेळाडू सहभागी झाले आहेत. दहा तारखेपर्यंत पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या टेबल टेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर दहा तारखेपर्यंत ही स्पर्धा होत आहे.

अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे आणि क्लबचे मानद सचिव सारंग लागू यांनी सांगितले की, पीवायसी एचडीएफसी रॅकेट लीग ही अनोखी व नाविन्यपूर्ण अशी लीग स्पर्धा मिश्र गटांत होणार असून यामध्ये प्रौढ, पुरूष, महिला आणि कुमार यांचा संघात समावेश असणार आहे.

क्लबचे मानद सचिव सारंग लागू पुढे म्हणाले की, क्लबच्या सभासदांकरिता क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, फिटनेस आणि इतर सर्व रॅकेट क्रीडा प्रकारांमध्ये अशा चार वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात लीग स्पर्धा आयोजित करणारा पीवायसी हिंदू जिमखाना क्लब हा शहरांतील एकमेव क्लब आहे. तसेच या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून सदस्यांना मनोरंजनबरोबरच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्वपूर्ण ठरेल. या प्रमुख स्पर्धेबरोबर सलग दुसऱ्या वर्षी 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी किड्स लीग स्पर्धा खेळविण्यात येणार असुन यामध्ये 40 खेळाडूंचा समावेश आहे.

सारंग लागु पुढे म्हणाले की, स्पर्धेला सलग दुसरी वर्षी एचडीएफसी बँक यांचे प्रायोजकत्व लाभले असून आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच, याशिवाय ही स्पर्धा सलग सात वर्षे आमच्या क्लबमध्ये यशस्वीरित्या पार पडत असल्यामुळे आम्हांला खुप आनंद होत आहे.

या लढतीमध्ये दोन्ही संघात मिळून बॅडमिंटन व टेबल टेनिस प्रकारात आठ सामने आणि टेनिस प्रकारात सात सामने असे एकूण 23 सामने होणार आहेत. तसेच, प्रत्येक क्रीडा प्रकारात खेळाडूला त्याच्या खेळातील क्षमतेनुसार स्टार देण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत या तीनही क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे त्यांनी नमुद केले. या तीनही क्रीडा प्रकारात खुल्या दुहेरी गटाचे सामने प्रत्येकी 30 गुणांचे तर, याशिवाय टेनिस प्रकारात 6 व 7चे सामने प्रत्येकी 20गुणांचे असणार आहेत.

स्पर्धेसाठी 194 खेळाडूंची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून हे खेळाडू सहा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यामध्ये तेजस किंजवडेकर(4750,स्पिअर्स)सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्यानंतर या खेळाडूंमध्ये नील केळकर(4250, तलवार्स), संग्राम पाटील(4050,लॅन्सर्स), राहुल पाठक(4000,रॉकेट्स), आर्य देवधर(4000,कोल्टस) यांचा समावेश आहे.

स्पर्धेतील सहभागी संघ व संघमालक यामध्ये
रावेतकर मस्कीटर्स – अमोल रावेतकर, पराग चोपडा
अय्यर कोल्ट्स-अथर्व अय्यर व समीर जालन
पंडित जावडेकर तलवार्स-शिवकुमार जावडेकर
स्पिअर्स – अमोल जोग व आशुतोष आगाशे
रॉकेट्स – तुषार मेंगळे
लॅन्सर्स – आलोक तेलंग यांचा समावेश आहे.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अभिषेक ताम्हाणे, तुषार नगरकर, तन्मय आगाशे, सारंग लागु, रणजीत पांडे, दिप्ती सरदेसाई, केदार नाडगोंडे, नंदन डोंगरे यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments