कमावत्या स्त्रियांनी प्रथमच आर्थिक सज्जतेबाबत पुरुषांना मागे टाकले, आयुर्विमा आणि सुरक्षिततेबाबतची माहिती वाढल्याचा परिणाम
गृहिणींमधील आर्थिक सज्जतेत पिछाडी, आयपीक्यूमध्ये किंचित घट होऊन तो ३६ अंकांवर, कमावत्या स्त्रियांच्या तुलनेत विरुद्ध परिस्थिती
मार्च ७, २०२४, नवी दिल्ली: कमावत्या स्त्रियांद्वारे विमा उत्पादने खरेदी केली जाण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असल्याचे, मॅक्स लाइफच्या इंडिया प्रोटेक्शन कोशंट सर्व्हे (आयपीक्यू)* ह्या फ्लॅगशिप सर्वेक्षणाच्या सहाव्या आवृत्तीमध्ये आढळले आहे. कंटार ह्या जागतिक स्तरावरील आघाडीच्या मार्केटिंग डेटा व अॅनालिटिक्स कंपनीच्या सहयोगाने हे सर्वेक्षण केले जाते. आयपीक्यू १.०मध्ये कमावत्या स्त्रियांमध्ये विमा उत्पादने खरेदी करण्याचे प्रमाण ५९ टक्के होते, ते आयपीक्यू ६.० मध्ये ७३ टक्क्यांवर पोहोचले आहे. आयुर्विमा काढण्यात कमावत्या स्त्रियांनी पुरुषांना मागे टाकले आहे. आयुर्विमा योजना खरेदी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ७९ टक्के आहे.
ह्या सर्वेक्षणानुसार, शहरी भारतीय स्त्रियांमधील आर्थिक संरक्षणाच्या पातळीने ४० अंकांचा टप्पा प्रथमच ओलांडला आहे. गेल्या ६ वर्षांत ते ३३ अंकांवरून ४१ अंकांवर पोहोचले आहे. मात्र, गृहिणींमधील संरक्षणाच्या स्तरात आयपीक्यू ५.०च्या तुलनेत किंचित घट झाली आहे. आयपीक्यू ५.० मध्ये ते ३८ अंकांवर होते, तर आयपीक्यू ६.० मध्ये ३६ अंकांवर आले आहे. गृहिणींमध्ये आर्थिक संरक्षणाबाबत जागरूकता वाढवण्याची गरज ह्यातून अधोरेखित होते. ह्याउलट, कमावत्या स्त्रियांमधील संरक्षणांक आयपीक्यू ५.० मध्ये ४३ होता, तो आयपीक्यू ६.० मध्ये ४७ झाला आहे.
आयुर्विमा खरेदीमध्ये सकारात्मक कल दिसून येत असला, तरी आर्थिक सज्जतेमधील लिंगविषयमता कायम आहे. आर्थिक संरक्षणात शहरी भारतातील पुरुष ४६ अंकांवर आहेत, तर शहरी भारतातील एकंदर सरासरी ४५ अंकांवर आहे. शहरी भारतातील पुरुष व स्त्रियांमधील आर्थिक संरक्षणातील तफावत ही प्रामुख्याने आयुर्विम्याबाबतच्या जागरूकता स्तरांमुळे आहे. पुरुषांचा ज्ञान निर्देशांक ६४ आहे, तर स्त्रियांमध्ये तो केवळ ५४ आहे. आयपीक्यू ६.०नुसार, स्त्रियांमधील आर्थिक सुरक्षितता ६४ टक्क्यांवर आहे, आयपीक्यू १.० सर्वेक्षणातील म्हणजेच कोविडपूर्व काळातील ६५ टक्क्यांचा स्तर अद्यापही गाठला गेलेला नाही.
आयुष्यातील अनिश्चिततांपासून कुटुंबियांचे संरक्षण करण्याप्रती शहरी भारतातील स्त्रियांमध्ये भक्कम बांधिलकी आहे असे आयपीक्यू ६.० मध्ये दिसून आले आहे. त्यामुळेच पुरुष व स्त्रियांमधील विषमता हळूहळू कमी होत आहे. पुरुषांमध्ये आयुर्विमा खरेदी करण्याचे प्रमाण ७६ टक्के आहे, तर स्त्रियांमध्ये ते ७३ टक्के आहे. आयपीक्यू १.० मध्ये टक्केवारीत ९ अंकांची तफावत होती (पुरुषांमध्ये ६८ टक्के, तर स्त्रियांमध्ये ५९ टक्के), ती आता केवळ ३ टक्केवारी अंकांवर आली आहे.
मॅक्स लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रशांत त्रिपाठी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना, स्त्रियांमधील आर्थिक सज्जतेबाबत विचार करणेही महत्त्वाचे आहे. आयुर्विम्यातील गुंतवणुकीच्या माध्यमातून स्त्रिया आपली आर्थिक स्थिती सुरक्षित करण्याच्या दिशेने सक्रियपणे पुढे जात आहेत, हे आयपीक्यू ६.० ह्या ताज्या अहवालातून स्पष्ट होते. मात्र, आर्थिक जागरूकतेतील लिंगविषमता अद्याप कायम असल्याचेही ह्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. स्त्रियांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणूनच, ‘सर्वांसाठी विमा’ हे समावेशक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी टेलर्ड उत्पादने ह्या समूहासाठी आणावीत असे आवाहन संपूर्ण क्षेत्राला करणे गरजेचे आहे.”
संपादकांसाठी टिपणे:
इंडिया प्रोटेक्शन कोशंट ६.० ह्या अभ्यासात, शहरी भारतातील पुरुष व स्त्रियांमध्ये आर्थिक सज्जतेबाबत आढळलेली स्थित्यंतरे पुढील निष्कर्ष अधोरेखित करतात:
आर्थिक सुरक्षिततेबाबत शहरी भारतातील कमावत्या स्त्रियांनी पुरुषांना मागे टाकले आहे
४७ अंक एवढ्या प्रोटेक्शन कोशंटसह कमावत्या महिला आर्थिक सज्जतेमध्ये पुरुषांना मागे टाकत आहेत, पुरुषांमध्ये हा अंक आयपीक्यू ६.०नुसार ४६ आहे. पुरुषांमधील आयुर्विमा खरेदीचे प्रमाण ७६ टक्के आहे, तर स्त्रियांमधील हे प्रमाण वाढून ७९ टक्के झाले आहे. आर्थिक सज्जता व जबाबदारी ह्या निकषांवरील लिंगविषयक आयामांमध्ये लक्षणीय बदल झाल्याचे ह्यातून दिसून येते.
कमावत्या स्त्रिया व गृहिणी ह्यांच्यात आर्थिक संरक्षणांकामध्ये ११ अंकांची तफावत असल्याचा आयपीक्यू ६.०चा निष्कर्ष
शहरी भारतात राहणाऱ्या कमावत्या स्त्रिया व गृहिणींमध्ये आर्थिक सज्जतेबाबत चिंताजनक प्रवाह आयपीक्यू ६.० ह्या अभ्यासात दिसून आला आहे. आयपीक्यू ५.० मध्ये ह्या दोन समूहांच्या आर्थिक संरक्षणांकामध्ये ५ अंकांची तफावत होती. मात्र, ताज्या अहवालात ही तफावत वाढली आहे. आयपीक्यू ६.० मध्ये गृहिणींचा संरक्षणांक ३६ अंकांवर आहे, त्यांचा ज्ञान निर्देशांकही ४७ अंकांवर आहे. कमावत्या स्त्रियांमध्ये तो ६४ अंकांवर आहे.
मुदत विम्याच्या खरेदीमध्ये कमावत्या स्त्रियांनी आघाडी घेतली आहे, मुदत योजनांच्या जागरूकतेमधील लिंगविषमता भरून काढली आहे
आयपीक्यू ६.०नुसार, शहरी भारताती ३५ टक्के कमावत्या स्त्रियांकडे आता मुदत विमा योजना आहे, पुरुषांमध्ये हे प्रमाण ३३ टक्के आहे. ह्याउलट, गृहिणींमध्ये मुदत विमा खरेदीचा दर अद्याप १८ टक्केच आहे. ह्या दुर्लक्षित समूहाकडे लक्ष्य करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याची गरज ह्यातून पुढे आली आहे. कारण, सध्या दोनपैकी केवळ एका गृहिणीला मुदत योजनांबद्दल माहिती आहे. मुदत योजनांबद्दलच्या जागरूकतेमध्ये कमावत्या स्त्रिया व पुरुष दोघेही ७४ टक्क्यांवर आहेत.
शहरी भारतातील अधिकाधिक स्त्रिया मुदत संरक्षणाच्या पर्याप्ततेबाबत सुरक्षित
आयपीक्यू ६.०मधील निष्कर्षांनुसार, ५४ टक्के स्त्रियांनी त्यांच्या मुदत संरक्षणाच्या पर्याप्ततेबाबत सकारात्मक मत व्यक्त केले. हे प्रमाण आयपीक्यू ५.०च्या (४५ टक्के) तुलनेत अधिक आहे. शिवाय, संरक्षणाला (कव्हर) दिले जाणारे महत्त्व आयपीक्यू ५.०मध्ये ५९ टक्के होते, ते आयपीक्यू ६.०मध्ये ६२ टक्के झाले आहे. दखलपात्र बाब म्हणजे केवळ १ टक्का स्त्रियांना त्यांना एकूण किती रकमेची गरज भासेल ह्याबाबत आजघडीला खात्री नव्हती.
कमावत्या स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या अधिक चतुर आहेत, त्यांच्या उत्पन्नातून बचती व गुंतवणुका करतात
आयपीक्यू आकडेवारीतून एक दखलपात्र प्रवाह दिसून आला आहे: कमावत्या स्त्रिया आर्थिक चातुर्याबाबत पुरुषांना मागे टाकत आहेत. आपल्या उत्पन्नाचा अधिकाधिक भाग त्या बचत व गुंतवणुकीत सातत्याने घालत आहेत. आयपीक्यू ६.०नुसार, शहरी भारतातील कमावत्या स्त्रिया त्यांच्या उत्पन्नाचा ४२ टक्के भाग बचतीसाठी बाजूला काढत आहेत, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ४१ टक्के आहे. स्त्रिया परिश्रमपूर्वक बचत करत असल्या, तरी आरामदायी आयुष्यासाठी खर्च करण्याकडे त्यांचा कल पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे, त्या त्यांच्या उत्पन्नाचा १६ टक्के भाग चैनीवर खर्च करतात.
निवृत्तीच्या टप्प्यात आर्थिक स्वातंत्र्य: स्त्रियांमधील सर्वाधिक आढळणारी आर्थिक चिंता
उत्तरदात्यांपैकी ६८ टक्क्यांनी सेवानिवृत्तीच्या काळाबद्दल चिंता व्यक्त केली, ह्यावरून काम करणाऱ्या स्त्रियांवर सेवानिवृत्तीच्या नियोजनाचे ओझे मोठे आहे. आयपीक्यू ६.०मधील निष्कर्षांनुसार, ६६ टक्के कमावत्या स्त्रियांना जीवनशैली कायम राखण्याची चिंता आहे, तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ६३ टक्के आहे. शिवाय, कमावत्या स्त्रियांमध्ये उत्पन्नातील स्थैर्य किंवा नोकरीच्या सुरक्षिततेबाबत पुरुषांच्या तुलनेत अधिक चिंता आहे. मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी बचतीवर भर देण्याचे प्रमाणही स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे.
कमावत्या स्त्रिया आरोग्य व तंदुरुस्तीवर देतात अधिक लक्ष
अनेकविध सर्वांगीण सवयींच्या माध्यमातून आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी कमावत्या स्त्रिया अधिक सक्रिय असतात असे ह्या अभ्यासात आढळले आहे. तब्बल ६२ टक्के स्त्रिया ध्यानधारणा, योग आणि उपचारांसारख्या उपायांचा अवलंब करतात, पुरुषांमध्ये हे प्रमाण ५९ टक्के आहे. रोचक बाब म्हणजे, आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यातही स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत पुढे आहेत. नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे, स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी तसेच संभाव्य आरोग्य समस्या सुरुवातीच्या टप्प्यावर ओळखण्यासाठी त्या अधिक सक्रियपणे काम करतात.
—l


