Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedम्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत...

म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा* *आवश्यक उपाययोजना करण्याच्या ना. पाटील यांच्या सूचना*

*

पुणे : म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनसंदर्भातील समस्यांची तातडीने दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

म्हाळुंगे गावातील ऑर्चिड हॉटेल ते व्ही.टी.पी. बांधकाम प्रकल्पापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, तसेच ड्रेनेज लाईन आणि पावसाळी पाण्याच्या लाईन टाकण्याची मागणी घेऊन शिष्टमंडळाने ना. चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. तसेच, ग्रामस्थांच्या विविध अडचणींबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

ग्रामस्थांच्या मागणीची तातडीने दखल घेत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महापालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सदर रस्ता, ड्रेनेज तसेच पावसाळी पाण्याच्या लाईनची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले.

म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत असून, या कामांना आता गती मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी भाजप नेते गणेश कळमकर, माजी सरपंच सौ. रेखाताई पाडळे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, उद्योजक सोपानराव पाडळे, सुरेश पाडळे, सचिन पाडळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments