पुणे दि १७ – ॲागस्ट
जगात ‘भारत ही लोकशाहीची जननी (India is the Mother of Democracy)’ चा डंका पिटणारे भाजप’चे शिर्ष नेतृत्व किती दुट्टपी, स्वार्थी व ढोंगी आहे हे पंतप्रधानांनी स्वत:च् सिद्ध केले असून, “देशात स्वबुद्धीचा वापर करून, देशातील विद्यार्थी व तरूणांच्या भवितव्याचा व त्याद्वारे देश हिताचा” विचार करणारे राजकीय नेते, सिव्हिल सोसा. सदस्य वा लोकशाही जीवंत असल्याचे अस्तित्व दर्शवणाऱ्या सामाजिक चळवळींचे घटक’ ज्यांना नको आहेत,
त्याच पंतप्रधान मोदींनी या सर्वांची ‘दिमाग़ी नक्सल’ म्हणून निर्भत्सना केली, हा ‘लाल किल्या वरून लोकशाहीवर केलेला आघात’ असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धी निवेदनाद्वारे केले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान पदाची गरिमा घालवणारे, ‘वढे बुद्धीशत्रू’ ही असतील असे वाटले नव्हते. देशात केवळ निवडणूक जीवी राजकारण करत, स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग करत सर्वत्र ‘सत्ता प्राप्ती’ नंतरही, देशाच्या विद्यार्थी, तरूणांच्या, शेतकऱ्यांच्या वा छोट्या उद्योजकांच्या हितार्थ, लोकाभिमुख सत्ता राबवली जात नसल्यानेच् लोकशाही’ला अभिप्रेत ‘विविध स्तरावर’ आवाज उठवला जात आहे हे विविध घटनांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे मोदींच्या व्याख्येत ‘दिमागी नक्सली’ नक्की कोण(?) कारण नक्षलवादी हा राष्ट्र-विरोधी वा राष्ट्र-द्रोही असतो, ज्यांच्यावर सरकार पोलीसी कारवाई’ने अंमल व नियंत्रण करू शकते, त्यामुळे राजकीय ‘सत्ता-लोलुपतेतुन लोकशाही वर हुकुमशाहीचे सावट आणू पहाणारा चेहरा’ उघड़ा पडला आहे.
देशात व समाजात सत्ताधाऱ्यांना प्रश्न न विचारणारे, मुग गिळून गप्प बसणारे, विना बुध्दीचे नागरीक सर्वत्र अपेक्षित आहेत असेच “दिमागी नक्षल” या टीपणी वरून स्पष्ट झाले आहे.
भाजप’चे शीर्ष नेतृत्व, सत्तालोलुपते मुळे ‘भारतात लोकशाही आहे आणि येथे प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याचा आणि घटनेच्या चौकटीत वागण्याचा अधिकार आहे’ हे सोईने विसरतात.
‘पंतप्रधानांनी प्रथम दिवशी संसदेच्या पायरीवर डोके ठेवले मात्र संसदेसमोर सामोरे जाण्याचे घटनात्मक उत्तरदायीत्व झुगारले तसेच दुसऱ्या वेळी संविधान समोर नतमस्तक झाले मात्र घटनात्मक मुल्यांची अवहेलना व गळचेपी व आता ‘नागरीक केंद्र बिंदू म्हणायचे व नागरी हक्कांवर (घटनात्मक पदाद्वारे) धाक दपटशा करण्याचा प्रयत्न करायचा’ हे आता उघड झाले आहे.
देशातील ‘लोकशाही व संविधानीक मुल्यांची हत्त्या’ होत असलेल्या संकटमय परिस्थितीत, विद्यार्थी व तरुणाईचे भवितव्य सावरण्यासाठी, विद्यार्थी वर्गाच्या समस्या जाणून घेण्यासाठी, काँग्रेस व विरोधी पक्षनेते मा राहुलजी गांधी ‘विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी व समाज क्रांतीकारकां’च्या पुण्यनगरीत दि २२ ॲागस्ट रोजी येत आहेत ही देखील पुणे व महाराष्ट्रासाठी दुर्गम योगायोग वा संकटात संधी असुन, विद्यार्थी वर्गीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या ज्वलंत समस्या मांडाव्यात असे आवाहन देखील काँग्रेस वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
___________________________
सत्ता-पक्षांचे विरोधक, हे राष्ट्र द्रोही नव्हे तर राष्ट्र-हितैषी…! सत्ताधाऱ्यांच्या दोषांवर बोट ठेवणाऱ्यांना नक्षली म्हणणे, सत्तालोलुप स्वार्थी मानसिकता…! विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी व तरुणाईचे भवितव्य सावरण्यासाठी, काँग्रेसनेते मा राहुलजी गांधी दि २२ ॲागस्ट रोजी विद्येचे माहेरघर पुण्यनगरीत..! – प्रदेश कांग्रेस, वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
RELATED ARTICLES


