पिंपरी-चिंचवड, दि. १९ मार्च २०२६ : चऱ्होली येथील Priyadarshani Learning Womb स्कूलच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. महापौर रवि लांडगे प्रमुख उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. जितेंद्र सिंग यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा सौ. तरुणा सिंग यांनी केले. आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी शाळेची उद्दिष्टे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेची बांधिलकी अधोरेखित केली.
या शाळेत वाल्डॉर्फ शिक्षण पद्धती (Rudolf Steiner यांची संकल्पना) अवलंबण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच भारतीय ज्ञानपरंपरेतील वेद, उपनिषद, आयुर्वेद, योग आणि तत्त्वज्ञान यांचा समन्वय साधत शिक्षण देण्याचा अभिनव प्रयत्न येथे करण्यात येत आहे. पंचमहाभूत (पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश) या संकल्पनेवर आधारित वर्गखोल्यांची रचना ही या संस्थेची विशेष वैशिष्ट्ये ठरत आहेत.
कार्यक्रमास संस्थेच्या विविध शाखांतील प्राचार्य, उपप्राचार्य, समन्वयक, शिक्षकवृंद यांच्यासह परिसरातील नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या अभिनव उपक्रमांचे कौतुक करत संस्थेला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. महापौर रवि लांडगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “या शैक्षणिक उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व मूल्याधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, शिक्षण क्षेत्राला नवे बळ मिळेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल,” असा विश्वास त्यां
नी व्यक्त केला


