Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभाकरिता ३० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभाकरिता ३० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. 23: शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनीच्या (अमृत) लक्षित गटातील विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahaamrut.org.in संकेतस्थळावर ऑनलाईनपद्धतीने ३० एप्रिल, २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स लघुलेखन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात घेण्यात येतात. माहे जानेवारी, २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १० मार्च, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahaamrut.org.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज ३० एप्रिल, २०२६ पर्यंत मागविण्यात येत आहेत.

ऑनलाइन अर्जासोबत आर्थिक वर्षांचे (सन २०२५-२६) अथवा पुढील आर्थिक वर्षासाठी (सन २०२६-२७) लागू असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा आर्थिकदृष्टया दुर्बल घटक प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. शाळा सोडल्याचा दाखला, शालेय निर्गम उतारा आदी), परीक्षा (माहे जानेवारी २०२६) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते तपशीलासाठी बँकेचे पासबुक, रद्द केलेला धनादेश याची स्पष्ट प्रत जोडावी, असे अृमतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments