Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन - स्पर्धेत एकूण...

32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन – स्पर्धेत एकूण 5 लाख 98हजार रुपयांची पारितोषिक

पुणे, 18 एप्रिल 2026: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीत म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे.

 

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष राजीव बोडस, पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस यांनी सांगितले की, स्पर्धेत एकूण 5 लाख 98 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. देशभरातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून खेळाडूंनी नोंदणी केली असून यामध्ये वैयक्तिक गटात 1195, सांघिक गटात 197 आणि दुहेरी गटात 834 खेळाडू असा विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. तसेच, केवळ महाराष्ट्रातून 300 हून अधिक वैयक्तिक प्रवेशिका आल्या असून, 30 संघ आणि 166 दुहेरी जोड्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

 

यावेळी प्रकाश तुळपुळे, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ सचिव आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यतीन टिपणीस, स्पर्धा संयोजन सचिव आशिष बोडस आदी मान्यवर उपस्थित होते.

 

स्पर्धेला शारदा ग्रुप, डेक्कन डाईज व केमिकल इंडस्ट्रीज यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे स्टार खेळाडू मनीषा बोडस, वीणा जोशी, रंजना पत्की, सुशमा मोघरे, शिल्पा जोशी, राधिका दोरले, मयुरी दीक्षित आणि पुरुष गटात सुबोध देशपांडे, सूरज चंद्रशेखरन, केदार कसबेकर, मनीष रावत, प्रसाद नाईक यांसह अनेक दिग्गज खेळाडूंचे कौशल्य या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा 40, 45, 50, 55 60, 65, 70, 75 वर्षांवरील आणि 75 वर्षापुढील पुरुष व महिला अशा विविध वयोगटात सांघिक, एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात रंगणार आहे.

 

स्पर्धेसाठी बालेवाडी येथे 16 नवीन ‘स्टॅग’ टेबल टेनिस टेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून दररोज सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सामने होतील. स्पर्धेतील विजेत्यांना पदके, करंडक आणि प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अभिषेक जैन, श्रुती कानडे, सुहास दांडेकर, अनंत कुलकर्णी यांचा समा

वेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments