पुणे दिनांक १५ मे २०२६
एच२ई पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य फीडे मानांकन १९ वर्षाखालील गटाच्या बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीअखेर वीरेश शरणार्थी (पुणे), मानस गायकवाड (सोलापूर), राम परब मुंबई उपनगर या अनुभवी खेळाडूंनी मुलांच्या गटात तर श्रेया ही पोरगी सांगली श्रद्धा बजाज नागपूर सई पाटील पुणे या मानांकित खेळाडूंनी मुलींच्या गटात आघाडी कायम राखली. त्यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये २६ जिल्ह्यामधील ३०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये वीरेशियाने पुण्याच्याच आहार कार्तिक याच्यावर नेत्रदीपक विजय संपादन केला तर मानस याने मुंबई उपनगरच्या अध्रित दुबे याला पराभूत केले. परब याने पुण्याच्या श्रेयस पाटील याच्यावर सफाईदार विजय मिळविला.
गणेश सभागृह व अश्वमेध कार्यालय या ठिकाणी आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक सुनील पांडे, मिताली साळवेकर, कुलदीप साळवेकर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सरचिटणीस निरंजन गोडबोले, पुणे डिस्ट्रिक्ट चे सर्कलचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, उपाध्यक्ष हर्निश राजा, कार्यकारिणी सदस्य शेखर जोरी, स्पर्धा संयोजन सचिव राजेंद्र शिदोरे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे दुसऱ्या फेरीतील काही महत्त्वाचे निकाल पुढीलप्रमाणे- १९ वर्षाखालील मुले- वीरेश शरणार्थी (पुणे) दोन गुण विजयी विरुद्ध अहान कार्तिक (पुणे) एक गुण, मानस गायकवाड (सोलापूर) दोन गुण वि. वि. अध्रित दुबे (मुंबई उपनगर) एक गुण. राम परब (मुंबई उपनगर) दोन गुण वि.वि. श्रेयस पाटील (पुणे) एक गुण. अथर्व सोनी (ठाणे) दोन गुण वि.वि. श्रेयस कुदळे (सोलापूर) एक गुण. अयान सोमानी (पुणे) दोन गुण वि. वि. अधवान ओसवाल (मुंबई शहर) एक गुण.
मुली- श्रेया हिप्परगी (सांगली) दोन गुण वि. वि साजिरी देशमुख (सातारा) एक गुण. श्रद्धा बजाज (नागपूर) दोन गुण वि. वि. आरना विनयसिंग (पुणे) एक गुण. सई पाटील (पुणे) दोन गुण वि. वि. अनुष्का गांधी (पुणे) एक गुण. दिशा पाटील (कोल्हापूर) दोन गुण वि. वि. मैत्रेई अहिरे (ठाणे) एक गुण. श्रावणी उंडाळे (पुणे) दोन गुण वि. वि. यशश्री सुर्वे (मुंबई शहर) एक गुण
—+++


