Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत १९ मे रोजी राजकीय पक्षांची बैठक*

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत १९ मे रोजी राजकीय पक्षांची बैठक*

 

 

पुणे, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्रासह १९ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात हा कार्यक्रम दि. २० जून २०२६ पासून सुरू होणार असून त्याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये करावयाच्या तयारीचा आढावा, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती तसेच मतदारांमध्ये जनजागृती आणि व्यापक प्रसिद्धी याबाबत चर्चा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 

ही बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली दि. १९ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला येथे होणार आहे. संबंधित सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments