Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाने सादर केले 'एक रागा'; भारतातील सामायिक सांस्कृतिक...

आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाने सादर केले ‘एक रागा’; भारतातील सामायिक सांस्कृतिक लयीला अद्वितीय मानवंदना

पुणे, २९ मे २०२६ – भारताचा नृत्य, कारागिरी, वास्तुकला आणि प्रांतीय परंपरांचा समृद्ध वारसा लक्षात घेऊन आदित्य बिर्ला ज्‍वेलरीचा ब्रँड इंद्रियाने अद्वितीय सांस्कृतिक सादरीकरण एक रागा चे अनावरण केले आहे. हे सादरीकरण नृत्य या तत्त्वावर आधारित आहे, जिथे प्रत्‍येक हावभाव व हालचाल कथानक बनते आणि शरीर अभिव्यक्तीचे माध्यम बनते.

 

पुण्यात ‘एक राग’ सादरीकरण महाराष्ट्राच्या उत्सवप्रिय भावनेतून आणि लय, आत्मविश्वास व सादरीकरणात खोलवर रुजलेल्या ‘लावणी’ या नृत्यप्रकाराच्या हावभावयुक्त ऊर्जेतून प्रेरणा घेते. फिनिक्स मार्केट सिटी, पुणे येथे असलेले हे सादरीकरण प्रकाश, समृद्धी आणि शुभ सुरुवातीचे पारंपारिक प्रतीक असलेल्या ‘दीपस्तंभ’ या संकल्पनेवर आधारित आहे. ही जागा पारंपारिक महाराष्ट्रीयन सौंदर्यशास्त्राने प्रेरित घटकांना एकत्र आणते, जिथे हालचाल, संगीत आणि अलंकार हे एकात्मिक कथनाचा भाग बनतात. लावणीप्रमाणेच, जिथे प्रत्येक हालचालीत आत्मविश्वास आणि भावना असतात, ही जागा वधूचे व्यक्तिमत्त्व आणि तिची ओळख घडवणाऱ्या काळाच्या पलीकडील सांस्कृतिक विधींना दाखवते. या सादरीकरणाच्या केंद्रस्थानी, इंद्रियाचे दागिने नथ, पाटल्या आणि कोल्हापुरी साज यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांच्या माध्यमातून या प्रदेशाची सांस्कृतिक ओळख सादर करतात; जे महाराष्ट्रीयन वधूच्या वारशाशी आणि मांगलिक अभिव्यक्तीशी खोलवर जोडलेल्या अलंकार परंपरांना प्रकाशझोतात आणतात.

 

 

 

एकाच एकात्मिक लयीच्या माध्यमातून भारताच्या विविध सांस्कृतिक ओळखींचा उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने ही मोहिम पुणे, हैदराबाद, भुवनेश्वर आणि दिल्ली येथे राबवली जात आहे. प्रत्येक शहर तेथील नृत्यप्रकार, कलात्मक प्रभाव, दागिन्यांच्या परंपरा आणि वधूच्या अभिव्यक्तींद्वारे एक वेगळी प्रादेशिक कथा सादर करते, जी विविध प्रांतांमधील वधूची स्वप्ने सादर करते, तसेच लावण्य, सौंदर्य, आस आणि उत्सव या सामायिक भावनांद्वारे एकमेकांशी जोडलेली राहून स्वतःच्या स्वप्नातील वधू बनण्याची महत्त्वाकांक्षा जागृत करते.

 

या मोहिमेबाबत मत व्‍यक्त करत इंद्रियाचे मार्केटिंग अँड व्हिज्युअल मर्चंडाइजिंगचे प्रमुख शांतिस्वरूप पांडा म्हणाले, “‘एक रागा’च्या माध्यमातून आम्हाला अशा एका अनुभवाची निर्मिती करायची होती, जिथे संस्कृती फक्त पाहिली जाणार नाही, तर मनापासून अनुभवली जाईल. प्रत्येक प्रांतीय सादरीकरणाची स्वतःची एक दृश्यात्मक भाषा आहे, आणि तरीही एका सामायिक भावनिक लयीद्वारे एकमेकांशी जोडलेली आहे, ज्‍यामधून भारतातील विविध सांस्कृतिक अभिव्यक्ती दिसून येतात. ‘एक रागा’च्या माध्यमातून, दागिने हे फक्त अलंकार न राहता ओळख, कलात्मकता आणि वारशाचे उत्‍साही माध्यम बनतात, जे विविध वधूंच्या स्वप्नांना एकात्मिक भावनिक अनुभवात एकत्र आणतात.”

 

‘एक रागा’ देशभरात वाटचाल करत असताना ही मोहिम विलोभनीय कथाकथन आणि समकालीन सांस्कृतिक अनुभवांच्या माध्यमातून भारतातील प्रांतीय कलात्मकतेचा उत्सव साजरा करण्याच्या इंद्रियाच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करत आहे. वारसा, सादरीकरण, कारागिरी आणि डिझाइन यांना एकत्र आणून हा उपक्रम दागिन्यांची निर्मिती करण्याच्या ब्रँडच्या दृष्टिकोनाला दृढ करतो, जिथे हे दागिने फक्त परिधान केले जात नाहीत, तर अनुभवले जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments