Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedएव्हरी सेकंड मॅटर्स’ उपक्रमा अंतर्गत अपोलो हॉस्पिटल्सकडून ६०० हून अधिक पुणेकरांना सीपीआरचे...

एव्हरी सेकंड मॅटर्स’ उपक्रमा अंतर्गत अपोलो हॉस्पिटल्सकडून ६०० हून अधिक पुणेकरांना सीपीआरचे प्रशिक्षण*

 

 

*पोलीस कर्मचारी, रिक्षाचालक, कॅब चालक आणि नागरिकांनी घेतला आपत्कालीन प्रतिसादाचा प्रत्यक्ष अनुभव*

 

*पुणे, जून २०२६:* ‘एव्हरी सेकंड मॅटर्स’ या सामुदायिक आरोग्य उपक्रमांतर्गत अपोलो हॉस्पिटल्स पुणे यांनी शहरभरात आठवडाभर विविध ठिकाणी सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) आणि बीएलएस (बेसिक लाईफ सपोर्ट) प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करून ६०० हून अधिक नागरिकांना जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि योग्य प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात पोलीस कर्मचारी, रिक्षाचालक, कॅब चालक तसेच विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

या प्रशिक्षण सत्रांचे मार्गदर्शन अपोलो हॉस्पिटल्स, स्वारगेट, पुणे येथील आपत्कालीन वैद्यक आणि अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. सुजय पाटील आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, सराव सत्रे आणि वास्तव जीवनातील आपत्कालीन परिस्थितींची उदाहरणे यांद्वारे सहभागी नागरिकांना संकटाच्या प्रसंगी त्वरित मदत कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

*सीपीआर जनजागृतीच्या महत्त्वाविषयी बोलताना अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथील आपत्कालीन वैद्यक आणि अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. सुजय पाटील म्हणाले,* “ _हृदयविकाराचा झटका किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कुठेही आणि केव्हाही उद्भवू शकते . अशा परिस्थितीत योग्य केलेली मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते. सामान्य नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती ओळखता यावी आणि वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत योग्य प्रतिसाद देता यावा, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. पुण्यातील पोलीस कर्मचारी, वाहनचालक आणि नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अत्यंत समाधानकारक आहे. आज प्रशिक्षित झालेली प्रत्येक व्यक्ती उद्या एखाद्याचे प्राण वाचवणारी ठरू शकते_ .”

 

*या उपक्रमाबाबत बोलताना अपोलो हॉस्पिटल्स पुणे यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा करमरकर म्हणाल्या* , _“वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती पूर्वसूचना न देता उद्भवतात आणि अशा वेळी सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात. ‘एव्हरी सेकंड मॅटर्स’ या उपक्रमाद्वारे जीवनरक्षक कौशल्यांचे ज्ञान रुग्णालयाच्या चौकटीबाहेर नेऊन समाजातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी असो, रस्त्यावरचा रिक्षाचालक किंवा कॅब चालक असो अथवा एखाद्या सोसायटीतील नागरिक असो, आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी सर्वप्रथम पुढे येणारी व्यक्ती कोणतीही असू शकते. पुणेकरांनी या उपक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेरणादायी आहे. या प्रशिक्षणातून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि गरजेच्या वेळी ते पुढाकार घेऊन मदत करू शकतील, अशी आम्हाला आशा आहे_ .”

 

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, आरोग्यविषयक जनजागृती आणि आपत्कालीन परिस्थितींसाठी समाजाची तयारी वाढविण्याच्या दृष्टीने अपोलो हॉस्पिटल्स पुणे सातत्याने विविध उपक्रम राबवत असून निरोगी आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी कटिबद्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments