Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedदृष्टिहीन अंध भगिनी व जावई यांना अधिक मासानिमित्त स्नेहभोजन* सामाजिक कार्यकर्ते सागर...

दृष्टिहीन अंध भगिनी व जावई यांना अधिक मासानिमित्त स्नेहभोजन* सामाजिक कार्यकर्ते सागर पवार, विजया सागर पवार आणि कनिष्क सागर पवार यांच्या वतीने आयोजन

 

पुणे : अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि लाडक्या जावयांना स्नेहभोजन अशी प्रथा सर्वत्र थाटात साजरी केली जाते. प्रत्येकाच्या घराघरात होणारा हा आनंद सोहळा दृष्टिहीनभगिनी व जावई यांना भाऊ म्हणून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला. लाडक्या दृष्टिहीन भगिनी व जावयांना अधिक मासानिमित्त रविवार पेठेतील कस्तुरे चौकातील विठ्ठल मंदिरात सामूहिक स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे दरवर्षी होत असलेल्या दृष्टीहीन जोडप्यांच्या लग्नसोहळ्यानंतर आता त्यांच्यासाठी सेवा मित्र मंडळ व शिरीष मोहिते यांच्या सहकार्याने अधिक मासात जावई स्नेहभोजन, अधिक मास वाण व पोषाख प्रदान कार्यक्रमाचे आयोजन रविवार पेठेतील कस्तुरे चौक येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आले होते. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते सागर पवार, विजया सागर पवार आणि कनिष्क सागर पवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते, डॉ.मिलिंद भोई आदी उपस्थित होते.
आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत अधिक मासाचा सोहळा साजरा करण्यात आला. वैशाली भोई, वंदना मोहिते, ज्योती ढमाळ, विद्या बावधनकर, रोहिणी चेन्नूर, श्रध्दा गोरे यांनी या कार्यक्रमाकरिता विशेष सहकार्य केले.
विजया पवार म्हणाल्या, अधिक मास हा सेवा, दान आणि समाजहिताच्या कार्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या निमित्ताने दृष्टिहीन भगिनींसोबत स्नेहभोजनाचा आनंद वाटून घेण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे. स्नेहभोजन नंतर सगळ्यांना घरचा आहेर भेटवस्तू स्वरूपात करण्यात आला.

सेवा मित्र मंडळ आणि लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षांपासून दृष्टिहीन व दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सामूहिक विवाह उपक्रमात अनेक दिव्यांग जोडप्यांचे विवाह संपन्न झाले आहेत.

* फोटो ओळ : शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे दरवर्षी होत असलेल्या दृष्टीहीन जोडप्यांच्या लग्न सोहळ्यानंतर आता त्यांच्यासाठी अधिक मासानिमित्त स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन रविवार पेठेतील कस्तुरे चौक येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आले होते. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते सागर पवार, विजया सागर पवार आणि कनिष्क सागर पवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments