Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिरो मोटोकॉर्पकडून भारताच्या स्वावलंबी गतिशीलता भविष्याला गती देण्यासाठी आपल्या पहिल्या फ्लेक्स फ्यूएल...

हिरो मोटोकॉर्पकडून भारताच्या स्वावलंबी गतिशीलता भविष्याला गती देण्यासाठी आपल्या पहिल्या फ्लेक्स फ्यूएल मोटरसायकल्सचे अनावरण

फ्लेक्स फ्यूएल सक्षम स्प्लेंडर + आणि एचएफ डिलक्स लाँच

 

शाश्वत नाविन्यतांना चालना देत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल आणि स्कूटर्सच्या सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने आज आपल्या पहिल्या फ्लेक्स फ्यूएल वेईकल्स- आयकॉनिक स्प्लेंडर+ आणि एचएफ डिलक्स लाँच केल्या आहेत. या लाँचसह, भारताने १०० सीसी सेगमेंटमध्ये आपल्या पहिल्या फ्लेक्स फ्यूएल मोटरसायकल्सचे स्वागत केले आहे, जो देशाच्या अधिक स्वच्छ, स्वावलंबी आणि भविष्य-सज्ज गतिशीलतेच्या दिशेने वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. दैनंदिन प्रवासासाठी डिझाइन केलेली ही नाविन्यपूर्ण मोटरसायकल श्रेणी ई२० ते ई८५ पर्यंतच्या इथेनॉल-मिश्रित इंधनांशी पूर्णपणे सुसंगत आहे. ही नवीन लाइनअप ग्राहकांना त्यांच्या विश्वासार्ह कार्यक्षमता किंवा परवडणाऱ्या किमतीशी कोणतीही तडजोड न करता अत्यंत व्यावहारिक आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देते. दैनंदिन प्रवासातील कार्बनचे प्रमाण आणि पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षणीयरित्या कमी करून या मोटरसायकल्स २०३० पर्यंत इकॉनॉमिक कार्बन तीव्रता ४५ टक्क्यांनी कमी करण्याच्या भारताच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला पाठबळ देतात.

नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग (एमओआरटीएच) मंत्री श्री. नितीन गडकरी आणि माननीय केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (एमओपीएनजी) मंत्री श्री. हरदीप सिंग पुरी, तसेच हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. हर्षवर्धन चितळे यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला या मोटरसायकल्सचे अनावरण करण्यात आले.

 

माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग (एमओआरटीएच) मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, “भारत पर्यायी इंधन आणि स्वच्छ गतिशीलता तंत्रज्ञानाचा अवलंब वेगाने करत आहे. हिरो मोटोकॉर्पने सर्वसामान्यांच्या श्रेणीत फ्लेक्स फ्यूएल मोटरसायकल्स आणणे हे कच्चे तेल आयातीवरील अवलंबन कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन मिळेल, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण होईल आणि आत्मनिर्भर भारत व विकसित भारत ही संकल्पना अधिक दृढ होईल.”

 

माननीय केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री. हरदीप सिंग पुरी म्हणाले, “स्वच्छ आणि स्वदेशी बनावटीच्या इंधनाद्वारे भारत सातत्याने भविष्य-सज्ज गतीशीलता परिसंस्था तयार करत आहे. हिरो मोटोकॉर्पद्वारे फ्लेक्स फ्यूएल वेईकल्स सादर करणे, हा ऊर्जा सुरक्षा वाढवण्याच्या, कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्याच्या आपल्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. अशा नाविन्यतांमुळे भारताची जैवइंधन (बायोफ्यूएल्स) परिसंस्था अधिक प्रबळ होईल, आपल्या शेतकऱ्यांसाठी अधिक मूल्य निर्माण होईल आणि माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्वावलंबी आणि शाश्वत ऊर्जा भविष्याच्या संकल्पनेला पाठबळ मिळेल.”

 

हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हर्षवर्धन चितळे म्हणाले, “फ्लेक्स फ्यूएल सक्षम स्प्लेंडर + आणि एचएफ डिलक्सचे लाँच हे अधिक स्वच्छ आणि शाश्वत गतिशीलतेप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेतील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. जयपूरमधील आमच्या सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (सीआयटी) मध्ये विकसित केलेल्या या मोटरसायकल्स भविष्य-सज्ज आणि स्थानिक पातळीवर उपयुक्त असणारे तंत्रज्ञान देण्याच्या आमच्या कटिबद्धतेला सादर करतात. आयातीवर अजिबात किंवा अत्यंत कमी अवलंबन असल्यामुळे, आमच्या या मोटरसायकल्स उत्पादन क्षेत्रातील भारताच्या क्रांतिकारी क्षमतेला दाखवतात. तसेच, भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत, विकसित भारत आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या संकल्पनेला अधिक दृढ करतात.”

 

ई२० ते ई८५ पर्यंतच्या इथेनॉल मिश्रणांशी सुसंगत असलेली ही फ्लेक्स फ्यूएल पोर्टफोलिओ श्रेणी जुलै २०२६ मध्ये दिल्ली आणि महाराष्ट्रातील काही निवडक भागांत सादर केली जाईल, ज्यानंतर लवकरच ती देशभरात उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्यूएलची किंमत ७२,७९२ रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) असेल, तर स्प्लेंडर+फ्लेक्स फ्यूएलची किंमत ८२,७१० रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) असेल.

 

उत्पादन वैशिष्ट्येः

स्प्लेंडर + फ्लेक्स फ्यूएल

नवीन स्प्लेंडर + फ्लेक्स फ्यूएल मोटरसायकल ९७.२सीसी इंजिनसह येते, जे ई८५ इंधनासह ८,००० आरपीएम वर ६.३ केडब्ल्यू पॉवर आणि ६,००० आरपीएमवर ८.३ एनएम टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे बेस मॉडेलच्या तुलनेत अधिक चांगला परफॉर्मन्स मिळतो. या मोटरसायकलची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः

* ई२० ते ई८५ पर्यंतच्या फ्लेक्स फ्यूएल इंधनांशी सुसंगत

* हिरोचे पेटंट असलेले आय-३-एस आयडल-स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञान

* नवीन डिजी-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

* साईड स्टँड इंजिन कट-ऑफ

*ट्युबलेस टायर

* फ्लेक्स फ्यूएल क्षमतेसाठी सुधारित ईसीयू आणि अपग्रेड केलेले फ्यूएल सिस्टम कंपोनण्ट्स

*नवीन ब्लॅकसह लाइम यलो ग्राफिक्स

 

एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्यूएल

 

* एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्यूएलमध्ये ९७.२सीसीचे इंजिन देण्यात आले आहे, जे ई८५ इंधनासह ८,००० आरपीएमवर ६.३ केडब्ल्यू पॉवर आणि ६,००० आरपीएमवर ८.३ एनएम टॉर्क निर्माण करते. या मोटरसायकलची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः

 

* ई२० ते ई८५ पर्यंतच्या फ्लेक्स फ्यूएल इंधनांशी सुसंगत

* नवीन डिजी-अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

* साईड स्टँड इंजिन कट-ऑफ

* ट्युबलेस टायर

* साईड स्टँड इंजिन कट-ऑफ

* ट्युबलेस टायर

* फ्लेक्स फ्यूएल क्षमतेसाठी सुधारित ईसीयू आणि अपग्रेड केलेले फ्यूएल सिस्टम कंपोनण्ट्स

 

* नवीन ब्लॅकसह लाइम यलो ग्राफिक्स

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments