Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedगीतरामायणातील २० गीतांचे ११० मिनिटे शीळेवर (हनुमान ध्वनीवर) सलग सादरीकरणाचा विश्वविक्रम वर्ल्ड...

गीतरामायणातील २० गीतांचे ११० मिनिटे शीळेवर (हनुमान ध्वनीवर) सलग सादरीकरणाचा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाकडून नोंद : २८ जून रोजी सन्मान सोहळ्याचे आयोजन

: संगीतप्रेमी आणि हटके ग्रुपचे संस्थापक शिरीष कुलकर्णी यांनी गीतरामायणातील २० गीते कराओके ट्रॅकवर शीळेच्या माध्यमातून सलग ११० मिनिटे सादर करून प्रस्थापित केलेल्या विश्वविक्रमाची दखल घेत वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाने लॉन्गेस्ट कंटीन्यूअस विसलिंग परफॉर्मन्स ऑफ गीत रामायण सॉंग्स ऑन कराओके ट्रॅक’ या विश्वविक्रमाला अधिकृत मान्यता दिली असून, या निमित्ताने रविवारी, २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत सदाशिव पेठेतील इतिहास संशोधन मंडळाच्या राजवाडे हॉल मध्ये विश्वविक्रम सन्मान सोहळा आणि विशेष हनुमान ध्वनी (शीळ) गीतरामायण मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात विश्वविक्रम सन्मान सोहळ्यात विश्वविक्रमाचे सन्मानपत्र आणि मानचिन्ह मान्यवरकडून शिरीष कुलकर्णी यांना प्रदान होईल.

आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायणातील काही गीतांचे सादरीकरण शिरीष कुलकर्णी शीळेच्या माध्यमातून करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments