Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय स्वयंसेवक संघ सह्याद्री प्रभात कर्वेनगर शाखेतर्फे ३५२ वा शिवराज्याभिषेक...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सह्याद्री प्रभात कर्वेनगर शाखेतर्फे ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन साजरा.

 

 

छत्रपती शिवराय; राष्ट्रचेतना व अस्मितेचे प्रतिक

–विंग कमांडर अविनाश मुथाळ (निवृत्त)

 

पुणे

(प्रतिनिधी)

तिथीने शुद्ध त्रयोदशी म्हणजेच २७ जून रोजी विविध ठिकाणी संपन्न होणारा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन हा केवळ उत्सव नसून तो या भूमीचा राजकीय व सामाजिक अस्मितेचा हुंकार आहे”.इंग्रजी तारखेचा परका चष्मा नाकारून सूर्य – चंद्राच्या गतीवर आधारित ‘चांद्र – सौर’ कालगणनेनुसार साजरा होणारा मूळ उत्सव.” असे उदगार विंग कमांडर अविनाश मुथाळ ( निवृत्त ) यांनी काढले.ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते.राष्ट्रीय चेतना म्हणजेच विखुरलेल्या समाजाला एका सूत्रात बांधून हिंदवी स्वराज्याच्या सुशासनाचे मापदंड अधोरेखित करणारा सुवर्णकाळ असल्याचेही ते पुढे म्हणाले.”छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील असे महान आणि यशस्वी सम्राट आहेत की ज्यांची स्मृती केवळ वर्तमानातच नव्हे तर येणाऱ्या असंख्य पिढ्यांपर्यंत टिकून राहील व त्यांचे कार्य हे भारतीय अस्मिता,स्वाभिमान आणि राष्ट्र उभारणीची एक अमरगाथा म्हणून सदैव स्मरणात राहील”

कर्वेनगर हाऊसिंग सोसायटीच्या उद्यानासमोर हा सोहळा आयोजित केला होता.यामध्ये सोसायटीचे

नागरिक,स्वयंसेवक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेचे सह मुख्यशिक्षक प्रकाश देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे माननीय संघचालक (संभाजीभाग) अनिल व्यास यांचा व वक्ते विंग कमांडर अविनाश मुथाळ (निवृत्त) यांचा उपस्थितांना परिचय करून दिला.योग शिक्षक सुभाष फडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर “हा धन्य धन्य शिवराय” गीत सादर केले.

——–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments