Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedरामवाडी येथील  सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर माध्यमिक विद्यानिकेतन येथे  राष्ट्रीय...

रामवाडी येथील  सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर माध्यमिक विद्यानिकेतन येथे  राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे वृक्षावरोपण

 

 

पुणे

(प्रतिनिधी)

रामवाडी येथील सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर विद्यानिकेतन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या कर्वेनगर येथील *सह्याद्री प्रभात शाखा व भूमी* संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात वृक्षावरोपण करण्यात आले.

जेष्ठ स्वयंसेवक उल्हास सावळेकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थांना वृक्षावरोपण चे व वृक्ष संगोपनाचे महत्व सांगण्यात आले.नंतर शाळेच्या मैदानात पिंपळ,चिंच, चाफा,मोगरा या देशी रोपांचे वृक्षावरोपण करण्यात आले.याकामी संघाचे उल्हास सावळेकर,प्रकाश देशपांडे,प्रमोद कुलकर्णी,नंदकुमार कुलकर्णी,सुरेंद्र प्रधान तसेच भूमी संस्थेचे सावनी सावळेकर,साक्षी गुप्ता,धीरज मोरे,गायत्री पांगारे,जागृती पोवार,तन्वी शर्मा,अवनी मेढे,यांनी रोपे लावली.

याप्रसंगी विद्यानिकेतन चे शाळा प्रमुख सुभाष वेताळ,सहाय्यक शिक्षिका वैशाली देवकाते,सहाय्यक शिक्षक भूषण जोशी,शिक्षक श्रीकृष्ण मुंढे,नीता पावडे,संगीता देवकर,कल्पना ढोले,आदेश नाईक यांचे सहकार्य लाभले.

*हिंदू साम्राज्य दिन साजरा*

३५२ वा शिवराज्याभिषेक दिन शाळेमध्ये साजरा करण्यात आला.याप्रसंगी संघाचे प्रकाश देशपांडे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक,विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

——-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments