Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedजगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी...

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन* ▪️*उपमुख्यमंत्र्यांनी केली देहू येथे संत तुकाराम महाराज पादुकांची विधीवत पूजा*

 

पुणे, दि. ७: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान येथील शिळा मंदिरामध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांची राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधीवत पूजा करुन दर्शन घेतले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, सुनील शेळके, माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, माजी आमदार विलास लांडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते.

दर्शनानंतर संस्थानच्यावतीने श्रीमती पवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीमती पवार म्हणाल्या, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. दरवर्षीच भक्तीमय वातावरण माझ्या मनाला भावते. माऊलींना भक्तांची काळजी असल्यामुळे संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सुरळीतपणे पार पडेल, भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन व्हावे, त्यांची गैरसोय होवू नये, म्हणून आज निसर्गाने पावसाला विश्रांती दिली असावी, असेही श्रीमती पवार यावेळी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, काल संपूर्ण जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा आढावा घेऊन वारकऱ्यांना पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी येथे न येता पुणे शहरातच थांबावे आणि पालखी शहरात दाखल झाल्यानंतर सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. या भाविक भक्तांची पुण्यातच व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत.

टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments