Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedनथिंग तर्फे फोन (4b) चे अनावरण

नथिंग तर्फे फोन (4b) चे अनावरण

 

 

 

 

फोन (4a) मालिकेच्या यशावर आधारित, फोन (4b) हा नथिंगच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवाला पुढे नेणारा स्मार्टफोन असून, यात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले आणि 50MP OIS मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.

 

हे सर्व Nothing OS आणि Essential AI टूल्सद्वारे समर्थित आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नथिंग तर्फे फोन (4b) चे अनावरण

 

 

 

फोन (4a) मालिकेच्या यशावर आधारित, फोन (4b) हा नथिंगच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवाला पुढे नेणारा स्मार्टफोन असून, यात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 120Hz सुपर AMOLED डिस्प्ले आणि 50MP OIS मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.

 

 

हे सर्व Nothing OS आणि Essential AI टूल्सद्वारे समर्थित आहे.

 

 

 

लंडन, 07 जुलै 2026: लंडनस्थित ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रातील ब्रँड नथिंगने आज फोन (4b) हा स्मार्टफोन सादर केला. नथिंगच्या उत्पादन परिसंस्थेत प्रवेश करत (b) मालिकेतील हा पहिलाच स्मार्टफोन आहे. फोन (4a) मालिकेच्या यशावर आधारित फोन (4b) मध्ये नथिंगची वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन शैली, दैनंदिन वापरासाठी सक्षम कार्यक्षमता, बुद्धिमान, कौशल्यपूर्ण सॉफ्टवेअर आणि दीर्घकालीन विश्वासार्हता यांचा संगम साधण्यात आला आहे.

 

 

 

या स्मार्टफोनमध्ये नथिंगचे Glyph इंटरफेस, श्रेणीतील आघाडीची स्नॅपड्रॅगन प्रोसेसर कार्यक्षमता, नथिंगच्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये असलेली आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी, 50MP OIS मुख्य कॅमेरा, 120Hz Super AMOLED डिस्प्ले तसेच Essential AI टूल्स सह अँड्रॉईड मधील सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण आणि लोकप्रिय अनुभवांपैकी एक Nothing OS आहे.

 

आकर्षक डिझाइन

 

फोन (4b) मध्ये फोन (4a) मालिकेतील दोन महत्त्वपूर्ण डिझाइन वैशिष्ट्यांचा मिलाफ करण्यात आला आहे. फोन (4a) सोबत सादर करण्यात आलेला नवीन Glyph Bar आणि फोन (4a) Pro मधील अत्यंत लोकप्रिय Unibody डिझाइन यांचा यात समावेश आहे. यामुळे नथिंगच्या डिझाइनची आतापर्यंतची सर्वात शुद्ध अभिव्यक्ती साकारली असून त्यातून ठळक, सहज ओळखता येणारी आणि नथिंगची वेगळी ओळख प्रतीत होत आहे. कंपनीने अंतर्गत पातळीवर तयार केलेल्या 20 हून अधिक डिझाइन पर्यायांमधून अंतिम डिझाइनची निवड केली असून, त्यात दृश्यात्मक साधेपणा, वापरातील आराम आणि टिकाऊपणा यांचा समतोल साधत स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

या स्मार्टफोनमधील प्रत्येक तपशील हा रचना आणि कार्यक्षमता या दोन्ही बाबी अधिक सक्षम करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. नथिंगच्या डिझाइन तत्त्वज्ञानाशी सुसंगत राहून, फोन (4b) मध्ये परस्परविरोधी साहित्य, पोत आणि रंगछटा यांचा वापर करून संपूर्ण डिव्हाइसमध्ये अधिक खोली, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि अचूक दृश्यात्मक परिणाम निर्माण करण्यात आला आहे. क्रिस्टल-क्लिअर सॉफ्ट पॉलिमर कॅमेरा मॉड्यूल स्मूथ 3D कर्व्हड एजमध्ये असून त्या अखंडपणे इको-पॉलीकार्बोनेट Unibody मध्ये मिसळतात. यावर टिकाऊ तीन-स्तरीय कोटिंग देण्यात आले असून, त्यामुळे वापरताना आरामदायी आणि बोटांचे ठसे कमी दिसणारा अनुभव मिळतो. 600 Newtons पर्यंत बेंडिंग फोर्सला तोंड देण्याची क्षमता आणि धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंगसह फोन (4b) दैनंदिन वापरातील टिकाऊपणा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. त्याचवेळी त्याच्या आकर्षकतेत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन काळा, पांढरा आणि निळा या रंगांमध्ये उपलब्ध असून, प्रत्येक रंगसंगती नथिंगच्या वैशिष्ट्यपूर्ण पारदर्शक डिझाइन आर्किटेक्चरला उठाव देण्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहे.

 

 

 

मर्यादित आरसीबी एडिशन

 

आरसीबीचे मुख्य शीर्षक प्रायोजक म्हणून आणि क्लबच्या ऐतिहासिक दुसऱ्या आयपीएल विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी नथिंगने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सहकार्याने फोन (4b) आरसीबी एडिशन सादर केला आहे. विशेष लाल रंगसंगती, खास आरसीबी ब्रँडिंग आणि कलेक्टर्स एडिशन पॅकेजिंगसह हा अधिकृत आरसीबी स्मार्टफोन सहकार्याचा पहिलाच उपक्रम आहे. फोन (4b) आरसीबी एडिशन आजपासून बंगळुरू येथील नथिंगच्या फ्लॅगशिप मुख्य स्टोअरमध्ये विशेष विक्रीद्वारे उपलब्ध होईल.

 

 

 

अधिक सुधारित Glyph Bar

 

स्क्रीनकडे सतत पाहण्याची गरज न पडता महत्त्वाची माहिती मिळवत राहा. नथिंगची वैशिष्ट्यपूर्ण Glyph Bar आता फोन (4b) मध्ये अधिक स्वच्छ आणि सुधारित स्वरूपात परतली असून, नथिंगचा वेगळेपणा जपणारा अनुभव देत राहते. 45 स्वतंत्रपणे नियंत्रित करता येणाऱ्या मिनीLEDs आणि 3,500 nits पर्यंतच्या ब्राइटनेससह ही प्रणाली नोटिफिकेशन्स, चार्जिंगची प्रगती, रेकॉर्डिंग इंडिकेटर्स आणि वैयक्तिकृत अलर्ट्स अत्यंत स्पष्टपणे दर्शवते. महत्त्वाची माहिती एका नजरेत उपलब्ध करून देत Glyph Bar स्मार्टफोनशी अधिक सहज आणि कमी व्यत्यय आणणारा संवाद साधण्याचा अनुभव निर्माण करते.

 

 

 

स्नॅपड्रॅगनची ताकद

 

फोन (4b) च्या मध्यभागी Qualcommचा अत्याधुनिक 4nm मोबाईल प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 देण्यात आला आहे. हा प्रोसेसर फोन (4a)च्या जवळपासची कार्यक्षमता देतो आणि AnTuTu वर 1 दशलक्षपेक्षा अधिक स्कोअर प्राप्त करतो. प्रगत 4nm प्रक्रियेवर आधारित असल्यामुळे, जुन्या 6nm प्लॅटफॉर्मच्या तुलनेत तो अधिक सातत्यपूर्ण कार्यक्षमता, अधिक ऊर्जा कार्यक्षमतेसह सुधारित एआय क्षमता प्रदान करतो. Qualcomm च्या 6th Generation एआय इंजिन सोबत जोडल्यामुळे फोटोग्राफी, व्हॉइस रिकग्निशन आणि संपूर्ण Essential AI टूल्समध्ये डिव्हाइसवरील AI प्रक्रिया अधिक वेगवान होते. त्यामुळे मुख्य AI कार्यांसाठी क्लाउडवर अवलंबून न राहता अधिक जलद आणि प्रतिसादक्षम दैनंदिन वापराचा अनुभव मिळतो.

 

 

 

नथिंगची आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी

 

फोन (4b) मध्ये नथिंगच्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये असलेली आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी असून, ती फोन (4a) Pro पेक्षा 11% मोठी आहे. भारतीय बाजारातील वापराच्या पद्धती आणि हवामानाच्या परिस्थिती लक्षात घेऊन या बॅटरीचे विशेष अनुकूलन करण्यात आले आहे.

 

 

 

फोन (4b) मिश्र स्वरूपाच्या वापरात 18 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देतो. फोन (4a) पेक्षा हे प्रमाण 1 तास अधिक आहे. यामध्ये 22 तासांपर्यंत YouTube प्लेबॅक आणि 26 तासांपर्यंत Instagram ब्राउझिंगचा समावेश आहे. या 6,000mAh बॅटरीमध्ये नथिंगची इम्पॅक्ट-रेझिस्टंट सेफ सेल टेक्नॉलॉजी आहे. 1,200 चार्ज सायकल्सनंतर (सुमारे तीन वर्षांच्या दैनंदिन वापरानंतर) ही बॅटरी 90% पर्यंत क्षमता कायम ठेवते. तसेच, ती 33W वायर्ड फास्ट चार्जिंगला पाठबळ देते. त्यामुळे 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात 50% चार्जिंग आणि अवघ्या एका तासाहून थोड्या अधिक वेळात पूर्ण चार्जिंग होते.

 

 

 

 

 

फ्लॅगशिप ग्रेड थर्मल मॅनेजमेंट

 

फोन (4b) मध्ये खास तयार करण्यात आलेला 4,400mm² Vapour Chamber देण्यात आला असून, त्याची अचूक रचना स्मार्टफोनच्या अंतर्गत मांडणीनुसार साकारण्यात आली आहे. यामुळे फोन (4a) इतकीच प्रभावी थर्मल कार्यक्षमता मिळते. जास्त वापरादरम्यान हा स्मार्टफोन 2°C पर्यंत अधिक थंड राहतो. त्यामुळे थर्मल थ्रॉटलिंग कमी होते आणि गेमिंग तसेच 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगदरम्यान सातत्यपूर्ण कार्यक्षमता मिळते. स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 सोबत मिळून फोन (4b) BGMI आणि CODM मध्ये 90 FPS पर्यंत, तर Subway Surfers आणि League of Legends: Wild Rift यांसारख्या गेम्समध्ये 120 FPS पर्यंत सपोर्ट देते.

 

 

 

प्रत्येक स्तरावर उत्कृष्ट फोटोग्राफी

 

फोन (4a) मालिकेतील लोकप्रिय कॅमेरा अनुभवाला पुढे नेत, फोन (4b) मध्ये 50MP OIS मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यातून उत्कृष्ट, अतुलनीय तपशील आणि नैसर्गिक रंग पुनर्निर्मिती साधता येते. Optical आणि Electronic Image Stabilisation (OIS + EIS), 360° Ambient Light Sensor आणि 119° Ultrawide कॅमेऱ्याच्या संयोजनामुळे विविध प्रकाश परिस्थितींमध्ये अधिक स्पष्ट छायाचित्रे, अधिक स्थिर व्हिडिओ तसेच अधिक अचूक एक्स्पोजर आणि व्हाईट बॅलन्स मिळतो.

 

 

 

नथिंगच्या TrueLens Engine 4 द्वारे समर्थित फोन (4b) मध्ये Ultra XDR इमेजिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान 13 RAW फ्रेम्स एकत्र करून पारंपरिक HDR पेक्षा अधिक स्पष्ट Highlights, अधिक समृद्ध Shadow Detail आणि अधिक अचूक रंग निर्माण करते. सामान्यतः फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असलेले Ultra XDR तंत्रज्ञान फोन (4b) मध्ये प्रगत Computational Photography आणि अधिक नैसर्गिक, वास्तवदर्शी प्रतिमा उपलब्ध करून देते.

 

 

 

4K व्हिडिओ, OIS आणि Dual Capture

 

फोन (4b) 30fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. OIS, EIS आणि AI Anti-Shake यांच्या एकत्रित क्षमतेमुळे कोणत्याही अतिरिक्त उपकरणांशिवाय अधिक सलग आणि स्थिर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. याशिवाय, या विभागात प्रथमच Dual Video Capture हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. त्यामुळे वापरकर्ते समोरच्या आणि मागील कॅमेऱ्यांद्वारे एकाच वेळी रेकॉर्डिंग करू शकतात. तसेच, स्क्रीनवरील सेल्फी विंडो इच्छेनुसार कुठेही हलवून अधिक सर्जनशील, रचनात्मक नियंत्रण मिळवता येते.

 

 

 

फिल्टर्स, प्रीसेट्स आणि सर्जनशील टूल्स

 

फोन (4b) मध्ये फोटोग्राफी अधिक प्रभावी आणि अभिव्यक्तिपूर्ण करण्यासाठी विविध सर्जनशील टूल्स देण्यात आली आहेत. यामध्ये फोटो आणि व्हिडिओंसाठी खास Disco आणि DV Filters, त्वरित शैली नियंत्रणासाठी Signature Presets, तसेच नवीन सर्जनशील शैली शोधण्यासाठी Playground यांचा समावेश आहे.

 

 

 

आकर्षक Super AMOLED डिस्प्ले

 

फोन (4b) मध्ये 6.77-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120Hz Adaptive Refresh Rate, 1,200 nits Outdoor Brightness, 2,000 nits Peak Brightness आणि HDR10+ सपोर्ट उपलब्ध आहे. Super AMOLED तंत्रज्ञानामुळे प्रत्येक पिक्सेलच्या स्वतंत्र प्रकाश नियंत्रणाद्वारे अधिक गडद काळा रंग आणि अधिक तेजस्वी व अचूक रंग अनुभवता येतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments