Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedहर्बालाइफ इंडियाने फॉर्म्युला 1 न्यूट्रिशनल शेकमध्ये 'डेट्स कॅरॅमल' हा नवीन फ्लेवर सादर...

हर्बालाइफ इंडियाने फॉर्म्युला 1 न्यूट्रिशनल शेकमध्ये ‘डेट्स कॅरॅमल’ हा नवीन फ्लेवर सादर केला

 

 

बेंगळुरू, 7 जुलै 2026 : आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी हर्बालाइफ इंडियाने आपल्या फॉर्म्युला 1 न्यूट्रिशनल शेक मिक्स श्रेणीमध्ये ‘डेट्स कॅरॅमल’ हा नवीन फ्लेवर बाजारात आणला आहे. खजूर आणि कॅरॅमलच्या चवीचा सुरेख संगम असलेल्या या शेकमध्ये, खजुराच्या घट्ट रसापासून तयार केलेले खजुराचे कुरकुरीत तुकडे (डेट क्रंचेस) समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे हा शेक चविष्ट तर आहेच, शिवाय रोजच्या पोषणाची गरजही पूर्ण करण्यास मदत करतो.

 

आजचे ग्राहक चवदार, सोयीस्कर आणि रोजच्या आहारात सातत्याने वापरता येतील असे पर्याय शोधत आहेत. ही गरज लक्षात घेऊन हर्बालाइफ इंडियाने आपल्या फॉर्म्युला 1 न्यूट्रिशनल शेकच्या फ्लेवर श्रेणीत डेट्स कॅरॅमल हा नवीन फ्लेवर समाविष्ट केला आहे. यापूर्वी या शेकमध्ये व्हॅनिला, डच चॉकलेट, मँगो, कुल्फी आणि रोझ खीर हे फ्लेवर उपलब्ध होते. या नव्या पर्यायामुळे ग्राहकांना आपल्या आवडीनुसार अधिक फ्लेवरची निवड करता येणार असून, त्याचबरोबर त्यांचा विश्वास असलेल्या उत्पादनाचा लाभही घेता येईल.

 

या नव्या फ्लेवरच्या लॉन्चबाबत हर्बालाइफ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय खन्ना म्हणाले, “आजकाल अधिकाधिक लोक अशा पोषणयुक्त आहाराचा शोध घेत आहेत, जो त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीत सहजपणे बसू शकेल आणि त्यासाठी कोणतीही तडजोड करावी लागणार नाही. लोकांना वापरण्यास सोपे, चविष्ट आणि एकूण आरोग्याला पूरक असे पर्याय हवे आहेत. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आम्ही ‘डेट्स कॅरॅमल’ हा नवीन फ्लेवर विकसित केला आहे. यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतील, तसेच फॉर्म्युला 1 श्रेणीची संतुलित पोषण देण्याची ओळखही कायम राहील. आमचे उद्दिष्ट ग्राहकांना त्यांच्या आरोग्यदायी दिनचर्येत सातत्य राखण्यास मदत करणारे अधिक पर्याय उपलब्ध करून देणे आहे. हर्बालाइफमध्ये आम्ही भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वैज्ञानिक संशोधनावर आधारित उत्पादने विकसित करण्यावर भर देत असून, त्यांना अधिक निरोगी आणि सक्रिय जीवन जगण्यासाठी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

 

“फॉर्म्युला 1 न्यूट्रिशनल शेक मिक्स – डेट्स कॅरॅमलमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचे संतुलित मिश्रण आहे, जे शरीराच्या दैनंदिन पोषणाची गरज पूर्ण करण्यास मदत करते.

 

उत्पादनाच्या लेबलवरील शिफारशीनुसार सेवन केल्यास, प्रत्येक सर्व्हिंगमधून 9 ग्रॅम उच्च दर्जाची प्रथिने, 3 ग्रॅम फायबर तसेच 19 प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. हा शेक जेवणाचा पर्याय (‘मील रिप्लेसमेंट’) म्हणूनही वापरता येतो. तसेच, हा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहार असल्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो.

 

हा शेक तयार करणे सोपे असून, प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यात बदलही करता येतात. त्यामुळे व्यस्त आणि धावपळीच्या जीवनशैली असलेल्या व्यक्तींसाठी तो एक सोयीस्कर पर्याय ठरतो. कॅलरी नियंत्रित आहार आणि नियमित मध्यम स्वरूपाच्या व्यायामासोबत दिवसातील एक किंवा दोन वेळचे जेवण याऐवजी हा शेक घेतल्यास तो पौष्टिक जेवणाचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

 

विविध फ्लेवर्सच्या वाढत्या श्रेणीमुळे फॉर्म्युला 1 न्यूट्रिशनल शेक मिक्स ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देत असून, त्यांच्या दैनंदिन पोषणाच्या सवयींमध्ये सातत्य राखण्यासही

मदत करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments