Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedटोयोटा किर्लोस्कर मोटरने वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार (MoU) छत्रपती संभाजीनगरमध्ये...

टोयोटा किर्लोस्कर मोटरने वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार (MoU) छत्रपती संभाजीनगरमध्ये “टोयोटा वसुंधरा” उपक्रमाची सुरुवात

 

 

 

छत्रपती संभाजीनगर, 31 जुलै 2026: टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आज वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) सोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे. या कराराअंतर्गत “टोयोटा वसुंधरा” नावाचा सर्वसमावेशक जलसंधारण व जलव्यवस्थापन कार्यक्रम पायठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नऊ गावांमध्ये राबवला जाणार आहे. हा उपक्रम 6,167 हेक्टर क्षेत्र व्यापणार असून त्यातील 20% क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे 2,398 घरांतील 11,268 लोकांना थेट लाभ होणार आहे.

 

औपचारिक MoU स्वाक्षरी समारंभ छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी श्री. विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे वरिष्ठ प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

 

मराठवाडा विभाग, विशेषतः पायठण आणि CSN ब्लॉकमध्ये, अत्यंत कमी व अनियमित पावसामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सरासरी पाऊस फक्त 610 मिमी पडतो, तर आवश्यक प्रमाण 748 मिमी आहे. बिडकीन औद्योगिक क्षेत्राजवळील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर होत असून, शेतीची जमीन खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. या भागातील सुमारे 78% शेतकरी पाण्याच्या अस्थिर पुरवठ्याची तक्रार करतात, तर 93% शेतकऱ्यांना हंगामी उत्पन्नात मोठे चढउतार सहन करावे लागतात. या पाणीटंचाईमुळे शेतकरी एकाच पिकावर अवलंबून राहतात, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी व अस्थिर राहते आणि ग्रामीण गरिबीचे चक्र कायम राहते.

 

शाश्वत जलस्रोत व्यवस्थापन आणि संवर्धनाची गरज ओळखून टोयोटा किर्लोस्कर मोटरने वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टसोबत भागीदारी केली आहे. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट ही भारतभर जलसंधारण प्रकल्प राबवण्यात सिद्धहस्त संस्था आहे. याआधी TKM ने उत्तर कर्नाटकात WOTR सोबत यशस्वी जलसंधारण कार्यक्रम राबवले आहेत. त्याच अनुभवावर आधारित “टोयोटा वसुंधरा” उपक्रमांतर्गत समुदाय विकास उपक्रम, मृदा व जलसंधारण उपाययोजना, जलस्रोत विकास आणि गरजेनुसार उपजीविका सहाय्य दिले जाणार आहे. प्रणालीबद्ध जलसंधारणाद्वारे या उपक्रमाचे उद्दिष्ट सिंचनक्षमता वाढवणे, विविध पिके घेण्यास सक्षम करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर ठेवणे आणि महत्त्वपूर्ण जलस्रोतांचे संवर्धन करणे आहे.

 

प्रकल्पाच्या अंमलबजावणीत समुदायाच्या सहभागाला प्राधान्य दिले जाणार आहे. स्थानिक हितधारक नियोजन, अंमलबजावणी आणि दीर्घकालीन जलसंधारण संरचनांच्या व्यवस्थापनात सक्रिय योगदान देतील. अपेक्षित परिणामांमध्ये शेती व घरगुती वापरासाठी पाण्याची उपलब्धता वाढणे, जमिनीची सुपीकता व शेती उत्पादनक्षमता सुधारणे, विविध पिकांच्या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनेक उत्पन्न स्रोत मिळणे आणि ग्रामीण समाजाची उपजीविका अधिक सक्षम होणे यांचा समावेश आहे.

 

या प्रसंगी बोलताना, छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट श्री. विनय गौडा जी.सी. म्हणाले,”टोयोटा वसुंधरा उपक्रम हा उद्योग, सामाजिक संस्था आणि शासन यांच्यातील अर्थपूर्ण भागीदारीचे प्रतीक आहे, ज्याद्वारे मराठवाड्यातील सर्वात गंभीर समस्येला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतीच्या टिकाऊपणासाठी आणि ग्रामीण समृद्धीसाठी जलसंधारण अत्यावश्यक आहे. या प्रदेशासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरची बांधिलकी आम्ही कौतुकास्पद मानतो आणि शेतकरी समुदायासाठी जलसुरक्षा व हवामान प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या या सहयोगी प्रयत्नाला आम्ही पाठिंबा देण्यास उत्सुक आहोत. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला निश्चितच गती देईल.”

 

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कंट्री हेड अँड एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट, कॉर्पोरेट अफेअर्स, श्री. विक्रम गुलाटी, म्हणाले, “टोयोटा वसुंधरा आमच्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे की शाश्वत विकासासाठी पाणी, शेती आणि ग्रामीण उपजीविका या परस्पर जोडलेल्या आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे. WOTR च्या तज्ज्ञतेसोबत भागीदारी करून आणि सिद्ध झालेल्या जलसंधारण पद्धती अंमलात आणून आम्ही शेतकरी समुदायांच्या दीर्घकालीन प्रतिकारशक्तीत गुंतवणूक करत आहोत आणि ज्या भागात आम्ही कार्यरत आहोत तिथे अर्थपूर्ण बदल घडवत आहोत.”

 

2001 पासून टोयोटा किर्लोस्कर मोटर समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. शिक्षण, पर्यावरण, रस्ता सुरक्षा, कौशल्य विकास, आरोग्य व स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांमध्ये उपक्रम राबवले गेले आहेत. गरजेनुसार हस्तक्षेप आणि तज्ज्ञ संस्थांसोबत तसेच शासकीय यंत्रणांसोबत धोरणात्मक भागीदारी करून TKM भारताच्या विकास उद्दिष्टांना हातभार लावत आहे. त्याचबरोबर “क्रिएटिंग मोबिलिटी फॉर ऑल” या जागतिक तत्त्वज्ञानाला पुढे नेत आहे.

 

 

TKM चे संक्षिप्त अवलोकन

इक्विटी सहभाग

टोयोटा मोटर कॉर्पोरेशन (जपान): 89%, किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेड (भारत): 11%

कर्मचारी संख्या

6,466

जमिनीचे क्षेत्रफळ

अंदाजे 432 एकर (सुमारे 1,700,000 m²)

बांधकाम क्षेत्रफळ

74,000 m2

एकूण स्थापित उत्पादन क्षमता

3,42,000 युनिट्सपर्यंत

 

 

TKM पहिल्या प्रकल्पाचे संक्षिप्त अवलोकन

स्थापना

ऑक्टोबर 1997 (उत्पादनाची सुरुवात: डिसेंबर 1999)

स्थान

बिदाडी

उत्पादने

इनोव्हा हायक्रॉस, इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर, लेजेंडर – भारतात निर्मित

स्थापित उत्पादन क्षमता

1,32,000 युनिट्सपर्यंत

 

 

TKM दुसऱ्या प्रकल्पाचे संक्षिप्त अवलोकन:

 

उत्पादनाची सुरुवात

डिसेंबर 2010

स्थान

टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड, बिदाडी

उत्पादने

कॅम्री हायब्रिड, अर्बन क्रूझर हायरायडर, हिलक्स

 

स्थापित उत्पादन क्षमता

2,10,000 युनिट्सपर्यंत

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments