पुणे, ३ ऑगस्ट २०२६ : हयात इंडिया आणि साऊथ वेस्ट एशिया तर्फे मेड विथ लव्ह,सर्व्हड विथ रिवॉर्ड्स ही मोहीम सादर केली आहे.१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत, वर्ल्ड ऑफ हयातचे सदस्य या क्षेत्रातील सहभागी हयात हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये पात्र खाद्यपदार्थ व पेयांवर खर्च केल्यास दुप्पट पॉइंट्स मिळवू शकतात. प्रत्येक जेवण सदस्यांना रिवॉर्ड्सच्या आणखी जवळ घेऊन जाईल. मिळवलेले पॉइंट्स वापरून वर्ल्ड ऑफ हयातच्या सर्वात कमी रिडेम्प्शन स्तरानुसार, कॅटेगरी १ हॉटेलमध्ये केवळ ३,००० पॉइंट्समध्ये मोफत स्टँडर्ड रूममध्ये एका रात्रीचा मुक्काम करता येणार आहे
.


