पुणे, ३ ऑगस्ट २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल) आपल्या ‘समर्थ बाय ह्युंदाई’ या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय पॅरा- ॲथलीट चंदीप सिंग यांना विशेषरित्या डिझाइन केलेल्या ह्युंदाई क्रेटामधून काश्मीर ते कन्याकुमारी आणि परत असा ७,००० हून अधिक किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. असामान्य धैर्य, चिकाटी आणि ॲक्सेसिबल मोबिलिटीच्या सामर्थ्याचे दर्शवत चंदीप सिंग यांनी ही विक्रमी मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आणि ‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये मानाचे स्थान मिळवले.विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या ह्युंदाई क्रेटा ने चंदीप सिंग यांना भारतातील पॅरा-ॲथलीट कडून भारतातील सर्वात लांब क्रॉस-कंट्री ड्राईव्हपैकी एक यशस्वीपणे पूर्ण करता आली.


