भारतातील ‘डिजिटल-फर्स्ट’ जेन झीसाठी डिझाईन केलेल्या ऑफरमध्ये ‘वी’च्या एकाच रिचार्जमध्ये मिळणार प्रीमियम म्युझिक, मनोरंजन आणि अनलिमिटेड कनेक्टिविटी
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ ने आज तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅन्ससोबत ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय स्पॉटिफाय प्रीमियमचा लाभ घेता येणार आहे. एकाच रिचार्जमध्ये प्रीमियम म्युझिक, मनोरंजन आणि वाढीव डेटाचे फायदे एकत्र मिळतील. म्युझिकचा फायदा देणारे हे बाजारातील सर्वात किफायतशीर प्रीपेड प्लॅन्स आहेत.
आजच्या तरुण पिढीमध्ये गाणी ऐकण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये स्पॉटिफाय प्रीमियमचा समावेश करून ‘वी’ने आपल्या फ्लॅगशिप रिचार्ज प्लॅन्सद्वारे प्रीमियम म्युझिक स्ट्रीमिंग अधिक सोपे केले आहे. यामुळे ग्राहकांना कोणत्याही जाहिरातींचा अडथळा न येता गाणी, ऑफलाइन डाउनलोड्स आणि हाय ऑडिओ क्वालिटीचा आनंद घेता येईल.
जे डेटा मोठ्या प्रमाणावर वापरतात आणि ज्यांना मनोरंजनाची खूप आवड आहे अशा युजर्ससाठी डिझाईन केलेल्या ‘वी’च्या ४३५ रुपयांच्या फ्लॅगशिप ‘वी नॉन-स्टॉप हिरो’ प्रीपेड प्लॅनमध्ये आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ‘स्पॉटिफाय प्रीमियम’चा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड ४जी/५जी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि जिओहॉटस्टार (मोबाईल) चा लाभ मिळेल. एकाच रिचार्जमध्ये प्रीमियम संगीत, मनोरंजन आणि अखंड कनेक्टिविटी हे सर्वकाही देणारा हा प्लॅन सर्वात जास्त कंटेंट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम मूल्य देणारा आहे.
प्रीमियम म्युझिक स्ट्रीमिंगचा आनंद जास्तीत जास्त युजर्सना घेता यावा यासाठी २५० रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ‘स्पॉटिफाय प्रीमियम’ दिले जात आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांच्या वैधतेसह २जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि ३०० एसएमएस करण्याची सुविधा मिळेल.
याशिवाय, ज्या ग्राहकांना केवळ टॉप-अप करायचे आहे, त्यांच्यासाठी २३० रुपयांचा पॅक उपलब्ध आहे. या पॅकद्वारे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ‘स्पॉटिफाय प्रीमियम’सह जिओहॉटस्टार, झी५, सोनीलिव, फॅनकोड, लायन्सगेट प्ले अशा २० पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा लाभ घेता येईल. या पॅकध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह ३०जीबी हाय-स्पीड डेटा देखील मिळेल, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या आवडत्या कंटेंटचा अखंड आनंद घेऊ शकतील.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फक्त पात्र असलेल्या प्लॅनने रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर वी ॲपमधील ‘ॲक्टिव सर्व्हिस’ अंतर्गत असलेल्या ‘क्लेम बेनेफिट्स’ पेजवर जावे लागेल. तिथे ‘स्पॉटिफाय प्रीमियम’ समोरील ‘क्लेम’वर क्लिक करून स्पॉटिफाय अकाउंट साइन-इन किंवा नवीन अकाउंट तयार करावे लागेल. या सोप्या पायऱ्या पार करताच प्रीमियम सबस्क्रिप्शन लगेच सुरू होईल.
हा ‘स्पॉटिफाय प्रीमियम’चा फायदा थेट ‘वी’च्या रिचार्ज सायकलशी जोडलेला आहे. त्यामुळे चालू रिचार्ज संपल्यावर ग्राहकांना पुन्हा पात्र असलेल्या दुसऱ्या रिचार्ज पॅकने रिचार्ज करून कोणत्याही जाहिरातींशिवाय अखंड गाणी ऐकण्याचा अनुभव सुरू ठेवता येईल. ‘वी’चे युजर्स आपल्या सध्याच्या स्पॉटिफाय आयडीचा वापर करून किंवा नवीन स्पॉटिफाय अकाउंट तयार करून ‘वी ॲप’द्वारे हा फायदा सहजपणे सुरू करू शकतात.
या सर्व ऑफर्समुळे ‘वी’चे हे नवीन प्रीपेड प्लॅन्स म्युझिक बेनेफिट मिळवून देणारे सध्याचे सर्वात किफायतशीर प्लॅन्स ठरले आहेत. यामुळे ग्राहकांना व्हॉईस आणि डेटाच्या फायद्यांसोबतच ‘स्पॉटिफाय प्रीमियम’चा एकत्र आनंद घेता येईल.
या नवीन ऑफरमुळे ‘वी’चा एंटरटेनमेंट पोर्टफोलिओ अधिक मजबूत झाला आहे. ‘वी’च्या विविध प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये आधीपासूनच नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, जिओहॉटस्टार, सोनीलिव, झी५ यांसारख्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. आता ‘स्पॉटिफाय प्रीमियम’ आणून ‘वी’ आपल्या प्रीमियम एंटरटेनमेंट ऑफर्स वाढवत आहे; ज्यामुळे ग्राहकांना संगीत, चित्रपट, खेळ आणि टीव्ही मनोरंजनामध्ये अधिक पर्याय, सुविधा आणि सर्वोत्तम मूल्य मिळेल.


