Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedआधार मूकबधिर विद्यालयातील १०३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

आधार मूकबधिर विद्यालयातील १०३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे, दि.४ ( प्रतिनिधी )
“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत”या उद्देशाने भारतीय संस्कृती संवर्धक संस्था,सेवा सहयोग आणि सणस वाडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज आधार मूकबधिर विद्यालय,बिबवेवाडी पोलीस चौकीच्या मागे,नवग्रह मंदिराजवळ,पुणे येथे शालेय साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत विद्यालयातील १०३ मूकबधिर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या,कंपास पेटी तसेच गोष्टींची पुस्तके यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शिक्षणाला आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमास भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे विश्वस्त बाजीराव मणेरे,रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष राम बांगड,सणस वाडा प्रतिष्ठान चे अध्यक्ष तन्मय पारेकर ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असून,समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आधार मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंत वानखेडे,शिक्षिका पूर्वा महाले, विश्वस्त विद्या गोखले व संस्थेचे कर्मचारी,तसेच भारतीय संस्कृती संवर्धक संस्था,सेवा सहयोग आणि सणस वाडा प्रतिष्ठानचे पदाधिकारी,स्वयंसेवक,कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments