Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedशिपरॉकेट लिमिटेड’चा आयपीओ १२ ऑगस्ट रोजी होणार खुला ‘आयपीओ’साठी किंमतपट्टा प्रति...

शिपरॉकेट लिमिटेड’चा आयपीओ १२ ऑगस्ट रोजी होणार खुला ‘आयपीओ’साठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ९२ ते ९७ रुपये असा निश्चित

शिपरॉकेट कंपनीच्या या ‘आयपीओ’मध्ये १० रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठीची किमान किंमत (फ्लोअर प्राइस) ९.२ पट, तर कमाल किंमत (कॅप प्राइस) ९.७ पट आहे.
बोली वा ऑफरची प्रक्रिया बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होऊन शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी समाप्त होईल.
अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीचा दिवस मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ हा असेल.
गुंतवणूकदारांना किमान १५४ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल. त्यानंतर १५४ शेअर्सच्या पटीत त्यांना बोली लावता येणार आहे.
‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ची (आरएचपी) लिंक : https://www.axiscapital.co.in/contents/Shiprocket%20Limited%20-%20RHP%20-%20August%205,%202026-1785937235.pdf

भारत, ६ ऑगस्ट २०२६ : शिपरॉकेट लिमिटेड या कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्रीची (आयपीओ) प्रक्रिया बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार आहे.

या ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर ९२ ते ९७ रुपयांचा किंमतपट्टा (प्राइस बँड) निश्चित करण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांना किमान १५४ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल. त्यानंतर १५४ शेअर्सच्या पटीत बोली लावता येणार आहे.

अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याचा दिवस मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ असणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी बोलीची प्रक्रिया बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल.

दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या या ऑफरचा एकूण आकार १,६१७.४९ कोटी रुपये इतका आहे. यामध्ये ८८५.५० कोटी रुपयांच्या नव्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. तसेच, विद्यमान भागधारकांकडून ७३१.९९ कोटी रुपये किमतीच्या इक्विटी शेअर्सची विक्री (ऑफर फॉर सेल) करण्यात येणार आहे.

नव्या समभाग विक्रीतून मिळणारा निव्वळ निधी ‘शिपरॉकेट’च्या विविध प्लॅटफॉर्म्सच्या विस्तारासाठी वापरण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या उदयोन्मुख व्यवसायाच्या आणि मुख्य व्यवसायाच्या विपणन उपक्रमांमध्ये गुंतवणूक; तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधांसाठी आणि क्षमता विकसित करण्यासाठी गुंतवणूक; कंपनीने घेतलेल्या काही कर्जांची संपूर्ण किंवा अंशतः परतफेड अथवा मुदतपूर्व परतफेड (त्यावरील जमा झालेल्या व्याजासह); तसेच भविष्यातील संभाव्य अधिग्रहणांसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामांसाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.

या ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’अंतर्गत ऑफर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या शेअर बाजारांवर सूचीबद्ध करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी एनएसई हा नियुक्त (डिझिग्नेटेड) शेअर बाजार म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे या समभाग विक्रीचे ‘बुक रनिंग लीड मॅनेजर्स’ आहेत.

ही समभाग विक्री ‘एससीआरआर’चा नियम १९(२)(ब) आणि ‘सेबी आयसीडीआर’ नियमावलीतील नियम ३१ यांतील तरतुदींनुसार केली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ६(२) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेनुसार, निव्वळ ऑफरपैकी किमान ७५ टक्के हिस्सा हा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी) राखीव असेल. ‘बुक रनिंग लीड मॅनेजर्स’च्या सल्ल्याने क्यूआयबीच्या राखीव भागापैकी ६० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा अँकर गुंतवणूकदारांना वाटप करण्याचा कंपनीला अधिकार असेल. या अँकर गुंतवणूकदारांच्या वाटपातील ३३.३३ टक्के हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी, तर ६.६७ टक्के हिस्सा आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी राखीव असेल. मात्र, अँकर गुंतवणूकदारांना शेअर्स ज्या किमतीत वाटप केले जातील, त्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या वैध बोली या संस्थांकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अँकर गुंतवणूकदारांच्या राखीव भागाचे पूर्ण वाटप न झाल्यास, त्यातील उर्वरित इक्विटी शेअर्स हे ‘क्यूआयबी’साठी राखीव असलेल्या इतर भागात समाविष्ट करण्यात येतील.

याशिवाय, निव्वळ ‘क्यूआयबीं’साठी राखून ठेवलेल्यांतील ५ टक्के हिस्सा हा केवळ म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल. उर्वरित निव्वळ क्यूआयबी भाग (अँकर गुंतवणूकदार वगळून) सर्व पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (यामध्ये म्युच्युअल फंडांचाही समावेश) प्रमाणानुसार वाटप करण्यात येईल. यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. जर निव्वळ ऑफरपैकी किमान ७५ टक्के शेअर्स ‘क्यूआयबीं’ना वाटप करता आले नाहीत, तर सर्व बोलीदारांनी भरलेली रक्कम तातडीने परत करण्यात येईल. म्युच्युअल फंडांकडून आलेली मागणी निव्वळ क्यूआयबी भागाच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, उर्वरित शेअर्स इतर क्यूआयबींना प्रमाणानुसार वाटप करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. तसेच, निव्वळ ऑफरपैकी जास्तीत जास्त १५ टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयबी) राखीव असेल. त्यामध्ये २ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक-तृतीयांश हिस्सा राखीव असेल. तर १० लाखांपेक्षा जास्त रकमेचा अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दोन-तृतीयांश हिस्सा राखीव असेल. या दोनपैकी कोणत्याही गटातील हिस्सा पूर्णपणे भरला गेला नाही, तर उर्वरित शेअर्स दुसऱ्या गटातील पात्र गुंतवणूकदारांना ‘सेबी आयसीडीआर नियमावलीनु’सार वाटप करता येतील. यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या वैध बोली प्राप्त होणे आवश्यक आहे. याशिवाय, निव्वळ ऑफरपैकी जास्तीत जास्त १० टक्के हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (आरआयबी) राखीव असेल. त्यांनाही ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या वैध बोली सादर करणे आवश्यक असेल.

या ऑफरमध्ये १० रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सपैकी १ कोटींपर्यंत किंमतीचे शेअर्स हे पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. याला ‘कर्मचारी आरक्षण भाग’ असे म्हटले आहे. कंपनीला बुक रनिंग लीड मॅनेजर्स यांच्या सल्ल्याने आणि आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर, या कर्मचारी आरक्षण भागातून अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर ऑफर किमतीवर ९ रुपयांपर्यंत सवलत देण्याचा अधिकार असेल. याला कर्मचारी सवलत असे म्हटले आहे. कर्मचारी आरक्षण भाग वगळल्यानंतर उर्वरित ऑफरला ‘निव्वळ ऑफर’ (नेट ऑफर) असे संबोधले जाईल.

अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व बोलीदारांना या ऑफरमध्ये सहभागी होण्यासाठी ‘ॲप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट’ (एएसबीए) प्रक्रियेचा वापर करणे बंधनकारक आहे. यासाठी प्रत्येक बोलीदाराला आपल्या एएसबीए खात्याचा तपशील द्यावा लागेल. तसेच, ‘यूपीआय’द्वारे अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपला यूपीआय आयडी देणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित बोली रक्कम एससीएसबी किंवा यूपीआय यंत्रणेद्वारे, लागू असल्यास, अर्जदाराच्या खात्यात तात्पुरती रोखून ठेवली जाईल. अँकर गुंतवणूकदारांना निव्वळ ऑफरमधील अँकर गुंतवणूकदारांच्या राखीव भागासाठी एएसबीए प्रक्रियेद्वारे अर्ज करता येणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments