Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुढील तीन वर्षात बाजारपेठेतील हिस्सा दुप्पट करणार : ऑडी

पुढील तीन वर्षात बाजारपेठेतील हिस्सा दुप्पट करणार : ऑडी

मुंबई, ७ ऑगस्ट २०२६: ऑडी इंडियाने पुढील तीन वर्षांत भारतीय लक्झरी कार बाजारपेठेतील आपला हिस्सा सध्याच्या ८ टक्क्यांवरून दुप्पट करण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे. कंपनी २०२८ पर्यंत नवीन मॉडेल्स, फेसलिफ्ट्स तसेच ऑडी ई-ट्रॉन आणि परफॉर्मन्स मॉडेल्स बाजारात आणणार आहे.
सध्या कंपनीकडे देशांतर्गत रिटेल नेटवर्कमध्ये २५ शोरूम्स असून २०२६ मध्ये ३० शोरूम्सपर्यंत विस्तार करण्याची योजना आखली आहे. दीर्घकालीन दृष्टीने ग्रामीण तसेच टियर-२ शहरांमध्येही विस्तार करण्यावर भर देण्यात येणार आहे. ऑडीफिकेशन (Audiification) केले जाणार असून, २,५०० हून अधिक विक्री व सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. तसेच ऑडी अनुभव अधिक समृद्ध करण्यावरही कंपनी भर देणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments