ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ८५व्या जयंतीनिमित्त ‘संविधानासमोरील प्रश्न’ या विषयावर ज्येष्ठ लेखक व पत्रकार सुरेश द्वादशीवार यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हासदादा पवार राहणार आहेत. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम यांची विशेष उपस्थिती असेल. हे व्याख्यान शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता. गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहे.
भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची भूमिका तसेच सद्यस्थितीत संविधानासमोर उभे राहिलेले विविध प्रश्न यावर सुरेश द्वादशीवार आपल्या व्याख्यानातून विचार मांडणार आहेत. बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संविधानाच्या मूलभूत मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे व्याख्यान विचारप्रबोधन करणारे ठरणार आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पुणेकरांनी यात आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी केले आहे.
संपर्क – तेजस भालेराव (संघटक, यूक्रांद पुणे शहर) – 91724 87019, गणेश गाढवे (समन्वयक, गांधी दर्शन शिबीर) – 96579 49574.


