Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटने पूर्ण केली 25 वर्षे; कंपनीच्या भारतातील प्रगतीच्या प्रवासातील...

पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटने पूर्ण केली 25 वर्षे; कंपनीच्या भारतातील प्रगतीच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा

पुणे, महाराष्ट्र, 19 ऑगस्ट 2026: स्नॅक्स आणि पेये क्षेत्रातील प्रमुख कंपनी पेप्सिको इंडियाने आज आपल्या पुणे उत्पादक प्लांटच्या कामाची 25 वर्षे पूर्ण केली. या कालावधीत 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे पाठबळ असलेला हा प्लांट पेप्सिकोच्या ‘इन इंडिया, फॉर इंडिया’ या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. वर्षाला 62,100 टन उत्पादन क्षमतेसह हा एक महत्त्वाचा उत्पादन केंद्र बनला आहे. 2001 मध्ये सुरू झालेला हा 15 एकरचा प्लांट लेज, कुरकुरे, चीटोस, सॉलिड मस्ती आणि अंकल चिप्सचे उत्पादन करतो, जे प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भारतातील ग्राहकांना पुरवले जातात.
हा प्लांट पेप्सिकोच्या ‘पार्टनरशिप ऑफ प्रोग्रेस’ या विचाराचे एक उत्तम उदाहरण आहे, जो शेतकरी, समुदाय, कर्मचारी, उद्योग भागीदार आणि महाराष्ट्र सरकारच्या कित्येक दशकांच्या सहकार्यातून सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तयार झाला आहे. हा प्लांट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या माध्यमातून सुमारे 1,400 लोकांना सक्षम करतो, जे कर्मचाऱ्यांचे सातत्य आणि अनुभवाच्या मजबूत संस्कृतीला दर्शवते. हा महाराष्ट्रातील स्थानिक पुरवठादार, पूरक उद्योग आणि विस्तृत उत्पादन व्यवस्थेच्या वाढीसाठीही हातभार लावतो.
या प्रसंगी पेप्सिको इंडिया आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जागृत कोटेचा म्हणाले: “पुणे हे गेल्या 25 वर्षांपासून पेप्सिको इंडियाच्या विकासातील एक महत्त्वाचा भाग राहिले आहे. भारतातील आमचा हा दुसरा खाद्यपदार्थ बनवणारा कारखाना आहे. या कारखान्याची क्षमता आता सहा पटीने वाढली आहे आणि याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या माध्यमातून जवळपास 1,400 लोकांच्या उपजीविकेला हातभार लागला आहे. गेल्या काही वर्षांत पुण्याचा हा कारखाना पेप्सिको इंडियासाठी अनेक नवीन गोष्टींची सुरुवात करणारा ठरला आहे. देशातील पहिली स्वयंचलित पॅलेटायझेशन सिस्टीम आणि बटाट्याचे डिजिटल ऑटो-ग्रेडिंग करण्यापासून ते पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी करणाऱ्या पाणी-पुनर्वापराच्या नवीन तंत्रज्ञानाची सुरुवात इथूनच झाली आहे. 2022 पासून हा कारखाना झिरो लिक्विड डिस्चार्ज प्लांट म्हणून काम करत आहे, ज्यातून नवीन शोध आणि शाश्वत विकास एकत्र येऊन कसा मोठा बदल घडवून आणू शकतात हे दिसून येते. या प्रवासाच्या केंद्रस्थानी आमचे ‘प्रगतीसाठी भागीदारी’ हे तत्त्वज्ञान आणि शेतकरी, स्थानिक नागरिक, कर्मचारी व उद्योगातील भागीदारांसोबतची आमची मजबूत साथ राहिली आहे. पुणे कारखाना जेव्हा 25 वर्षे पूर्ण करत आहे, तेव्हा भारताप्रती आमची दीर्घकालीन बांधिलकी, स्थानिक उत्पादन आणि अधिक नाविन्यपूर्ण, मजबूत व शाश्वत भविष्य घडवण्याचा आमचा निश्चय यात स्पष्टपणे दिसून येतो.”
दीर्घकालीन भागीदारीतून शेतकऱ्यांच्या समृद्धीला बळ: पुण्यातील पेप्सिको इंडियाचे यश तिथल्या कृषी व्यवस्थेशी घट्ट जोडलेले आहे.
पेप्सिको इंडिया आपल्या पुणे प्लांटसाठी कच्चा माल मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांसोबत भागीदारी करत आहे, ज्यामुळे पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता सुधारत आहे आणि पुनरुज्पादक शेती पद्धतींना प्रोत्साहन मिळत आहे.
कंपनीने महाराष्ट्र आणि गुजरातसह प्रमुख राज्यांतील आपल्या बटाटा उत्पादक भागीदार शेतात 100% सूक्ष्म सिंचनाचा वापर साध्य केला आहे.
शाश्वत उत्पादनाचे भविष्य घडवणे: पेप्सिको पॉझिटिव्ह (pep+) च्या मार्गदर्शनाखाली, पुणे प्लांट प्रगत उत्पादन क्षमता आणि उद्योगातील अग्रेसर शाश्वत पद्धतींचा मेळ घालतो.
हा प्लांट सध्या आपली अक्षय ऊर्जेच्या (रिन्युएबल सोर्सेस) स्रोतांकडून तिच्या आवश्यकतेच्या 98.6% वीज मिळवतो, गेल्या सलग 6 वर्षांपासून झिरो लँडफिल वेस्टचा दर्जा टिकवून आहे आणि नोव्हेंबर 2022 पासून झिरो लिक्विड डिस्चार्ज प्लांट म्हणून कार्यरत आहे. हा प्लांट लागू असलेल्या सर्व एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी (EPR) नियमांचे पालन करतो.
हा प्लांट बटाट्यातील ओलावा पुन्हा मिळवण्याच्या तंत्रज्ञानासारख्या (पोटॅटो मॉइश्चर रिकव्हरी सिस्टीम) नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे थंड करण्याच्या पारंपरिक पद्धतींऐवजी पाण्याचा वापर कमी होतो. बटाटे धुण्याचे स्टार्चयुक्त पाणी पुन्हा उत्पादनात वापरले जाते, तर तळताना निघणारी वाफ गोळा करून, तिच्यावर प्रक्रिया करून तिचे वापरण्यायोग्य पाण्यात रुपांतर केले जाते. या उपायांमुळे एक वर्षात जवळपास 255 दशलक्ष लिटर पाण्याची बचत झाली, जे 1300 कुटुंबांच्या एक वर्षाच्या पाण्याच्या गरजेइतके आहे.
पेप्सिको इंडियाचा पुण्यातील सस्टेनेबल वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट (SWRDM) कार्यक्रम स्थानिक समुदायांच्या भागीदारीतून जलसंधारण आणि पुनर्भरणावर लक्ष केंद्रित करतो. हा उपक्रम सहा गावांमध्ये पसरलेला असून त्याचा 15,000 लोकांना फायदा होत आहे. तसेच जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याची क्षमता निर्माण करून या भागात 100% पेक्षा जास्त पाणी पुनर्भरणास मदत करत आहे.
पेप्सिको इंडिया या महत्त्वाच्या टप्प्याचा आनंद साजरा करत असताना, तिचा पुणे उत्पादक प्लांट नाविन्यपूर्ण शोध, शाश्वतता आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणाऱ्या भविष्यासाठी सज्ज आणि मजबूत कामांवर कंपनीच्या असलेल्या लक्ष्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. हा प्लांट स्थानिक मूल्यांची निर्मिती मजबूत करत, महाराष्ट्रातील आर्थिक विकासाला हातभार लावत आणि देशातील लाखो ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने पुरवत पेप्सिको इंडियाच्या दीर्घकालीन उत्पादन धोरणाचा मुख्य भाग बनून आहे. त्याच वेळी कंपनीच्या शाश्वत आणि जलद प्रगतीच्या दृष्टिकोनालाही हा प्लांट पुढे नेत आहे.
***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments