पुणे -पुणे शहरात रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका लहानग्याचा झालेला मृत्यू क्लेशदायक आहे. प्रशासनातील चालढकल याला कारणीभूत आहे.त्याकडे आपण अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे असे निवेदन माजी नगरसेवक उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की
पुण्यामध्ये कंत्राटदारांना रस्त्याची कामे न देता पुणे महानगरपालिकेचा पथविभाग हे काम करू शकतो.
१) खड्ड्यांचा बोल बाला झाल्यानंतर पथविभागाने काय केले हा प्रश्न आहे.
२) पथविभागाचा स्वतःचा हॉट मिक्स प्लांट आहे गेल्या तीन महिन्यांमध्ये दामराचे उत्पादन किती केले याची आकडेवारी कळणे गरजेचे आहे.
३) या हॉट मिक्स प्लांट मधून कोणत्या कोणत्या क्षेत्रीय कार्यालयाला डांबर पुरवला हे महत्त्वाचे आहे.
४) पेवर रोलर व्हायब्रेटर्स रोलर याचा खात्याने गेल्या तीन महिन्यात काय वापर केला, काही केलेच नाही.
५) पथविभागातील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगार यांनी खड्डे बुजवण्यासाठी गेल्या तीन महिन्यांमध्ये काय प्रयत्न केले हे एकदा खाते प्रमुखाने जाहीर करणे आपण त्यांना विचारणे गरजेचे आहे सर्व यंत्रसामग्री आपल्याकडे आहे टेंडरची गरजच नाही.
६) पथविभागाकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत 15 कोठे आहेत स्वतःच्या गाड्या आहेत मनुष्यबळ आहे जर ठरवलं असतं तर एकही खड्डा पुण्यामध्ये दिसला नाही इतका सक्षम संसाधने आपल्या पथविभागाकडे आहे दुर्दैवाने त्याच्याकडे कोणाचे लक्ष नाही टेंडर काढणे या एकाच कामांमध्ये अधिकारी गर्क झालेले आहेत.
साहेब….
आपण या सर्व बाबींचा आढावा घेऊन पुढच्या काळामध्ये किती टेंडर काढायची याचा निर्णय करावा लागेल आपण सक्षम आहोत मी नगरसेवक असताना खात्यामार्फत करून घेतलेले रस्ते वीस वर्षानंतर देखील चांगले आहेत.
आपण हॉट मिक्स प्लांट ला तातडीने व्हिजिट करावी सगळे रजिस्टर मेमो सगळ्या गोष्टी चेक कराव्यात काही अधिकारी फक्त डिझेल भरायला तिकडे आपली खाजगी गाडी घेऊन जातात इतकं दुर्दैव आहे.
एका लहानग्याचा मृत्यू क्लेशकारक आहे त्यापेक्षाही सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना काम न करण्याची प्रवृत्ती अधिक लेखक आहे एका मुलाचे जीवन वाचवू शकलो असतो.
आता तर क्षेत्रीय कार्यालयावर ढकलून मुख्य खाते नामा निराळे राहू इच्छिते हे अत्यंत चुकीचे आहे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आपण परवानगी दिली तर आम्ही देखील प्रत्यक्ष जागेवर जाऊन दाखवू शकतो.या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, महापौर, उपमहापौर आदींना देण्यात आल्या आहेत


