पुणे, १९ ऑगस्ट २०२६: प्रीमियम फिटनेस ब्रँड उर्बाउन्सने (Urbounce) निहिलेंट लिमिटेडने विकसित केलेले मेडिकल-ग्रेड इमोशन एआय प्लॅटफॉर्म ‘इमोस्केप’ (Emoscape) आपल्या सदस्यांच्या फिटनेस जर्नीमध्ये समाविष्ट केले आहे । या माध्यमातून सर्वांगीण फिटनेसच्या संकल्पनेत भावनिक स्थितीच्या मोजमापाचा नवा आयाम जोडण्यात आला आहे । फिजिकल फिटनेसच्या मापदंडांसोबत भावनिक स्थितीचाही विचार केला जाणार असल्याने, व्यक्तीची भावनिक स्थिती आणि शारीरिक कामगिरी यांच्यातील परस्परसंबंध अधिक व्यापकपणे समजून घेण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे ।
गेल्या अनेक दशकांपासून फिटनेस क्षेत्रात प्रगतीचे मोजमाप प्रामुख्याने खर्च झालेल्या कॅलरी, उचललेले वजन, व्यायामाचा कालावधी, चाललेल्या पावलांची संख्या आणि हृदयाचे ठोके यांसारख्या दिसून येणाऱ्या मापदंडांच्या आधारे केले जाते । हे मापदंड शारीरिक हालचालींबाबत महत्त्वाची माहिती देत असले, तरी ते फिटनेस जर्नीचा केवळ एक भाग स्पष्ट करतात । शरीरातील अंतर्गत भावनिक स्थितीचाही कामगिरी, व्यायामानंतरची पुनर्प्राप्ती, मानसिक लवचिकता, प्रेरणा आणि सातत्य यांवर तितकाच महत्त्वपूर्ण परिणाम होतो ।
इमोस्केपच्या प्रगत इमोशन एआय तंत्रज्ञानाच्या समावेशामुळे उर्बाउन्सचे सदस्य आता आपल्या दैनंदिन भावनिक स्थितीचे आकलन आणि मोजमाप करू शकतील । त्यातून भावनांचा त्यांच्या एकूण फिटनेस प्रगतीवर नेमका कसा परिणाम होतो, याबाबत त्यांना अधिक सखोल माहिती मिळणार आहे । या मूल्यांकनानंतर त्यातील निष्कर्षांचे मानसशास्त्रज्ञांकडून विश्लेषण केले जाईल । त्यानंतर सदस्याची भावनिक स्थिती आणि फिटनेसची उद्दिष्टे लक्षात घेऊन मानसशास्त्रज्ञ आणि फिटनेस मार्गदर्शक आवश्यक उपाययोजनांची शिफारस करतील ।
भावनिक स्थितीचा फिटनेसच्या परिणामांवर लक्षणीय प्रभाव पडतो । भावनिक असंतुलन आणि दीर्घकाळाचा ताण यामुळे कॉर्टिसॉलची पातळी, झोप आणि व्यायामानंतरची पुनर्प्राप्ती यावर परिणाम होऊ शकतो । त्याचबरोबर ऊर्जेची कमतरता आणि व्यायामातील सातत्याचा अभाव यामुळे नियमित व्यायामाची दिनचर्या विस्कळीत होऊन प्रगतीवर मर्यादा येऊ शकतात । चरबी कमी करणे, स्नायूंची वाढ, शारीरिक कामगिरी, पुनर्प्राप्ती आणि दुखापतीचा धोका यांसारख्या महत्त्वाच्या परिणामांवर या भावनिक घटकांचा प्रभाव पडतो । भावनिक स्थिती मोजता येण्याजोगी करून इमोस्केप सदस्यांना त्यांच्या भावना फिटनेस जर्नीवर कशा प्रकारे परिणाम करतात, हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते ।
उर्बाउन्स जिमचे सह-संस्थापक दीपक सांघवी म्हणाले, “उर्बाउन्सची सुरुवात करताना केवळ आणखी एक जिम उभारणे हे आमचे उद्दिष्ट कधीच नव्हते । लोकांना आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः स्वीकारण्यासाठी प्रेरणा देणारा आणि दीर्घकाळ ती बांधिलकी टिकवून ठेवण्यास प्रोत्साहन देणारा फिटनेस ग्रुप निर्माण करणे, ही आमची महत्त्वाकांक्षा होती । आज फिटनेसच्या या प्रवासात इमोशन एआयचा समावेश करताना आम्ही त्याच विचाराला आणखी व्यापक स्वरूप देत आहोत । फिजिकल फिटनेस हा मानवी आरोग्याचा केवळ एक पैलू आहे । आपल्या भावना, मानसिकता आणि मानसिक लवचिकता यांचा आपण अधिक निरोगी जीवनशैलीचा किती सातत्यपूर्ण आणि अर्थपूर्ण पद्धतीने पाठपुरावा करतो, यावर मोठा प्रभाव असतो । तंत्रज्ञान आपल्याला स्वतःबद्दलच्या जाणीवेची नवी पातळी देऊ शकते; मात्र त्या जाणीवेचा आपण प्रत्यक्षात कसा उपयोग करतो, यातच त्याचे खरे मूल्य आहे । तंत्रज्ञानासोबत मानवी कौशल्य, व्यावसायिक मानसशास्त्रीय मार्गदर्शन आणि सशक्त फिटनेस ग्रुपची सांगड घालत उर्बाउन्स फिटनेसकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे । आमच्यासाठी फिटनेसचे भविष्य केवळ अधिक मजबूत शरीर घडवण्यापुरते मर्यादित नाही; तर अधिक निरोगी, आनंदी आणि मानसिकदृष्ट्या लवचिक व्यक्ती घडवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे ।”
उर्बाउन्सचे सह-संस्थापक आनंद पांड्या म्हणाले, “उर्बाउन्समध्ये आम्ही नेहमीच असे मानत आलो आहोत की खरा फिटनेस हा केवळ फिजिकल फिटनेसपुरता मर्यादित नसतो । अनुभवी व्यावसायिक मार्गदर्शकांच्या मदतीने कार्यरत असलेला आमचा भावनिक आधार विभाग, व्यक्तीकडे एक संपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणून पाहण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे। इमोशन एआयचा समावेश या विचाराला आणखी पुढे घेऊन जातो । फिटनेसचा अनेकदा दुर्लक्षित राहणारा पैलू म्हणजे व्यक्तीची भावनिक स्थिती । तिच्याबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याचे काम या तंत्रज्ञानातून होते । इमोस्केप भावनिक स्थितीची जाणीव, व्यावसायिक मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील दुवा निर्माण करते । भावनिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांच्यातील संबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करून, अधिक सजग, प्रतिबंधात्मक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सर्वांगीण फिटनेस दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे। या दृष्टिकोनात फिजिकल फिटनेस, भावनिक स्थिती आणि भावनिक लवचिकता या मानवी कामगिरीच्या परस्परांशी जोडलेल्या बाबींचा एकत्रित विचार केला जातो ।”
या सहकार्याच्या माध्यमातून पुण्यातील उर्बाउन्सच्या विविध फिटनेस केंद्रांमध्ये बाणेर-पाषाण, हिंजवडी, पुनावळे, पिंपळे सौदागर, एफसी रोड, खराडी आणि कोथरूड इमोस्केपच्या इमोशन एआयवर आधारित भावनिक स्थितीच्या मोजमापाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे । या उपक्रमामुळे सदस्यांना त्यांच्या भावनिक स्थितीचा आणि फिजिकल फिटनेसचा परस्परसंबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल आणि त्यांच्या एकूण आरोग्य व फिटनेस जर्नीला अधिक सर्वांगीण स्वरूप मिळेल ।
निहिलेंटमधील इमोस्केपचे व्यवसाय संचालक श्री. संदीप पेंडूरकर म्हणाले, “फिटनेसचे भविष्य हे व्यक्तीच्या संपूर्ण अनुभवाला शारीरिक आणि भावनिक दोन्ही स्तरांवर समजून घेण्यात आहे। भावना प्रेरणा, पुनर्प्राप्ती, मानसिक लवचिकता आणि कामगिरीवर कशा प्रकारे प्रभाव टाकतात, हे व्यक्तींना समजून घेण्यास मदत करून इमोस्केप सर्वांगीण फिटनेसमध्ये एक प्रभावी नवा आयाम जोडते । उर्बाउन्ससोबतच्या आमच्या सहकार्याद्वारे आम्ही फिटनेस जर्नीमध्ये वस्तुनिष्ठ भावनिक मूल्यांकन आणत आहोत । त्यासोबत व्यावसायिक तज्ज्ञांचे विश्लेषण आणि योग्य उपाययोजनांमुळे भावनिक अंतर्दृष्टीपासून प्रत्यक्ष कृतीपर्यंतचा मार्ग तयार होतो । वस्तुनिष्ठ पद्धतीने भावनांची ओळख करणारे तंत्रज्ञान सर्वांगीण फिटनेसमध्ये एक महत्त्वाचा नवा आयाम कसा जोडू शकते आणि फिटनेस उद्योगाच्या उत्क्रांतीला कशा प्रकारे हातभार लावू शकते, हे हे सहकार्य अधोरेखित करते।”
या एकत्रीकरणामुळे आरोग्यसेवा, शिक्षण, क्रीडा आणि मानवी कामगिरी या क्षेत्रांमध्ये इमोस्केपची वाढती उपस्थिती अधिक बळकट होत आहे । जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भावनांचे मोजमाप करून त्यांचा कृतीयोग्य पद्धतीने वापर करता यावा, या इमोस्केपच्या दृष्टिकोनाला यामुळे आणखी बळ मिळते । मुख्य प्रवाहातील फिटनेसमध्ये इमोशन एआयचा समावेश करून या सहकार्याने चांगले निर्णय घेणे, सर्वांगीण फिटनेस आणि अधिक प्रभावी कामगिरी यामध्ये मानवी भावनांना केंद्रस्थानी आणले आहे ।
शारीरिक फिटनेससोबत भावनिक आरोग्यावरही भर; उर्बाउन्सच्या फिटनेस प्रवासात इमोस्केपचा समावेश
RELATED ARTICLES


