Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय संस्कृती संवर्धक संस्था व शनिवारवाडा साप्ताहिक मिलन यांच्या संयुक्त विद्यमाने कै...

भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व शनिवारवाडा साप्ताहिक मिलन यांच्या संयुक्त विद्यमाने कै राजीव आयाचित यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबिर संपन्न.

पुणे (प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शनिवार वाडा साप्ताहिक मिलनाचे कार्यवाह कै.राजीव अयाचित यांच्या स्मरणार्थ दिनांक २३ ऑगस्ट रोजी भारतीय संस्कृती संवर्धक संस्था आणि शनिवार वाडा साप्ताहिक मिलन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.कै.राजीव अयाचित यांचे मागील महिन्यात दुःखद निधन झाले होते.अत्यंत सुस्वभावी आणि कसबा पेठ भागात आपल्या मनमिळाऊ स्वभावाने,दांडग्या संपर्का मुळे ते सर्वांनाच परीचित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते एक समर्पित कार्यकर्ते होते.कसबा भाग कार्यवाह राहुलजी पुंडे आणि राहुल अयाचित यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. “याज्ञवल्क्य आश्रम” येथे संपन्न पडला. रक्तदान शिबिरात पंचवीस रक्तदात्यानी रक्तदान करून राजीवजींना श्रध्दांजली वाहिली.कार्यक्रम यशस्वितेसाठी सुनिल तांबट,दुर्गेश निजामपुरकर,अजय सातपुते,महेश काळे,भरत हजारे,अनिल बलकवडे,श्रीहर्ष सगरे,आशुतोष लिमये, ओंकार लंके,संदिप सुराणा,विलास क्षीरसागर,सचिन पुरोहित यांनी योगदान दिले.जनकल्याण रक्तपेढीच्या डाॅक्टर वैशाली जठार व त्याचा कर्मचारीवर्ग यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला.
सोबत फोटो

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments