Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedढोल-ताशाच्या निनादातून संस्कृती जपणाऱ्या वादकांच्या कर्तृत्वाचा गौरव ढोल...

ढोल-ताशाच्या निनादातून संस्कृती जपणाऱ्या वादकांच्या कर्तृत्वाचा गौरव ढोल ताशा महासंघ पुणे शहराच्या वतीने आयोजन

पुणे : ढोल-ताशाच्या निनादातून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या वादकांचे योगदान केवळ वादनापुरते मर्यादित नसून, विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने कुटुंब, पथक आणि समाजाचा गौरव वाढविणाऱ्या या वादकांच्या कार्याची दखल घेण्यात आली. ढोलाच्या टिपरूने संस्कृतीचा नाद घुमविणाऱ्या आणि दुसरीकडे शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य, शासकीय सेवा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वादकांचा सन्मान ढोल ताशा महासंघ, पुणे शहरातर्फे करण्यात आला.

 

बाजीराव रस्त्यावरील नु.म.वि. शाळेत सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यास श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आदर्श मित्र मंडळचे उदय जगताप, मैत्र युवा फाउंडेशनचे संकेत देशपांडे, ढोल ताशा महासंघाचे शिरीष थिटे, संघटक अनुप साठे आणि पुणे शहराचे अध्यक्ष अक्षय बलकवडे, संजय सातपुते, विवेक खटावकर उपस्थित होते. विविध पथकातील ४३ वादकांचा सन्मान करण्यात आला.

 

शिरीष थिटे म्हणाले, विविध ढोल-ताशा पथकांमध्ये वादन करताना शिस्त, जिद्द, परंपरा आणि सांस्कृतिक अभिमानाची जपणूक करणाऱ्या वादकांनी आपल्या कार्यक्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या दुहेरी योगदानाची दखल घेत मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 

उदय जगताप म्हणाले, ढोल-ताशा वादन ही केवळ कला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेली जबाबदारी आहे. या कलेच्या माध्यमातून परंपरा जपणाऱ्या वादकांनी विविध क्षेत्रांत मिळविलेले यश नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे वादकांच्या कर्तृत्वाचा सन्मान हा संस्कृतीच्या सन्मानासोबतच त्यांच्या मेहनतीला आणि योगदानाला दिलेली दा

द आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments