Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedटीसीएसने भारतात पहिली 'लाईट्स-आउट' फॅक्टरी लॅब सुरू केली; एआयवर आधारित उत्पादनाला गती...

टीसीएसने भारतात पहिली ‘लाईट्स-आउट’ फॅक्टरी लॅब सुरू केली; एआयवर आधारित उत्पादनाला गती देण्याचे उद्दिष्ट

 

 

 

पुण्यातील या अत्याधुनिक आणि भविष्यवेधी सुविधेत, उत्पादन क्षेत्रातील असेंब्ली लाईनद्वारे एआय, डिजिटल ट्विन्स, रोबोटिक्स आणि फॅक्टरी सिस्टीम्सचा वापर करून कामकाज कसे चालवले आणि अधिक सक्षम केले जाऊ शकते, याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल

 

 

 

पुणे, मुंबई ९ सप्टेंबर, २०२६: माहिती तंत्रज्ञान सेवा, सल्लासेवा आणि व्यवसाय उपाययोजना पुरवणारी, जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) पुण्याच्या सह्याद्री पार्क कॅम्पसमध्ये ‘टीसीएस इंडस्ट्रियल ऑटोनॉमी अँड इंजिनिअरिंग लॅब – लाईट्स-आउट फॅक्टरी’ सुरू केली आहे. भारतातील ही पहिलीच ‘लाईट्स-आउट फॅक्टरी लॅब’ असून, ही सुविधा ‘टीसीएस ह्युमन+एआय सर्व्हिस ऑटोनॉमी मॉडेल’चा वापर करून स्वतःहून कामकाज सुधारणारे कारखाने कशा प्रकारे ऑपरेशन्सचे ऑटोमेशन करू शकतात, याचे प्रात्यक्षिक दाखवेल. ही लॅब डिजिटल ट्विन्स, रोबोटिक्स, इंडस्ट्रियल एआय, फॅक्टरी कंट्रोल सिस्टीम्स आणि रिअल-टाइम ऑपरेशनल इंटेलिजन्स यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांना एकत्र आणते आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत त्यांचा थेट वापर करून दाखवते.

 

 

 

‘लाईट्स-आउट फॅक्टरी’ म्हणजे असा कारखाना जिथे स्वयंचलित यंत्रणा माणसांच्या अगदी कमीत कमी हस्तक्षेपाशिवाय उत्पादन करू शकतात. पुण्याच्या या लॅबमध्ये संपूर्णपणे रोबोटिक असलेली ‘बॅटरी पॅक असेंब्ली लाईन’ उभारण्यात आली आहे. ‘लाईट्स-आउट मॅन्युफॅक्चरिंग’ची तत्त्वे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवणारी ही भारतातील पहिलीच लॅब ठरली आहे. उत्पादनाचे अनेक टप्पे असलेल्या या जिवंत मॉडेलवरील चाचण्यांमुळे कंपन्यांना त्यांचे एआय-आधारित उत्पादन मॉडेल्स प्रत्यक्ष तयार करणे, तपासणे आणि मोठ्या प्रमाणावर राबवणे सोपे जाईल. कंपन्यांसमोर सध्या असणारे एक मोठे आव्हान म्हणजे इंडस्ट्री ४.०, एआय आणि रोबोटिक्स या संकल्पनांना प्रत्यक्ष कामकाजात कसे आणायचे; पुण्याची ही लॅब नेमकी याच आव्हानावर तोडगा काढते. यामुळे ग्राहकांना एका नियंत्रित वातावरणात प्रत्यक्ष औद्योगिक परिस्थितीचा अभ्यास करण्याची, तिची उपयुक्तता तपासण्याची आणि तंत्रज्ञान वापरताना येणारा धोका कमी करण्याची संधी मिळते.

 

 

 

‘टीसीएस इंडस्ट्रियल ऑटोनॉमी अँड इंजिनिअरिंग लॅब – लाईट्स-आउट फॅक्टरी’ ही टीसीएसच्या या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रवासातील नवा टप्पा आहे. औद्योगिक आणि मोबिलिटी ॲप्लिकेशन्ससाठी ‘फिजिकल एआय’ मधील संशोधनाला गती देण्यासाठी टीसीएसने याच वर्षाच्या सुरुवातीला बंगळुरूमध्ये ‘टीसीएस इंडस्ट्रियल ऑटोनॉमी अँड इंजिनिअरिंग लॅब पॉवर्ड बाय एनविडिया’ सुरू केली होती.

 

 

 

टीसीएसच्या ‘इंडस्ट्रियल ऑटोनॉमी अँड इंजिनिअरिंग’ क्षमतेचा एक भाग म्हणून, ही लॅब उद्योग क्षेत्रातील अनेक गरजा पूर्ण करते. यामध्ये मशीन कधी खराब होऊ शकते याचा अंदाज लावणे, स्वयंचलित पद्धतीने गुणवत्तेची तपासणी करणे, प्रत्यक्ष कामकाजात वेळेवर सुधारणा करणे, माणूस आणि मशीनमधील समन्वय आणि पूर्णपणे स्वयंचलित कारखाने चालवणे यांसारख्या विविध कामांचा समावेश आहे.

 

 

 

एसकेएफचे एसव्हीपी कमर्शियल अँड ऑपरेशन्स डेव्हलपमेंट, जोआकिम लँडहोम म्हणाले, “औद्योगिक प्रगतीसाठी कामकाजातील अडथळे किंवा चुका दूर करणे नेहमीच सर्वात महत्त्वाचे असते. उत्पादन क्षेत्रातील पुढील टप्पा हा अधिक स्मार्ट, ऊर्जा-बचत करणाऱ्या आणि अधिक विश्वासार्ह कामकाजावर अवलंबून असेल. टीसीएसची ही ‘इंडस्ट्रियल ऑटोनॉमी अँड इंजिनिअरिंग लॅब – लाईट्स-आउट फॅक्टरी’ उद्योगांना प्रगत ऑटोमेशन आणि इंडस्ट्रियल एआयचे रूपांतर प्रत्यक्ष मोजता येण्याजोग्या व्यावसायिक मूल्यामध्ये करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे आम्हाला वाटते.”

 

 

 

टीसीएसच्या ‘इंडस्ट्रियल ऑटोनॉमी अँड इंजिनिअरिंग’चे ग्लोबल हेड आणि व्हाईस प्रेसिडेंट श्रीनिवास चक्रवर्ती म्हणाले, “जेव्हा आपण एखाद्या कारखान्याचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर जुन्या पद्धतीचे कारखाने, मोठी यंत्रसामग्री आणि तिथे करावी लागणारी प्रचंड शारीरिक मेहनत येते. टीसीएसमध्ये आम्ही या वातावरणाचा पुनर्विचार करत असून भविष्यातील कारखाने तयार करत आहोत. आमच्या या अत्याधुनिक ‘टीसीएस इंडस्ट्रियल ऑटोनॉमी अँड इंजिनिअरिंग लॅब – लाईट्स-आउट फॅक्टरी’च्या माध्यमातून आम्ही एआय-आधारित उत्पादन यंत्रणा विकसित करण्याच्या टीसीएसच्या ध्येयाला पुढे नेण्याचे काम करत आहोत. आम्ही एक अशी सुविधा उभारली आहे जी ग्राहकांचे ‘लाईट्स-आउट मॅन्युफॅक्चरिंग’चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत करू शकते. ही लॅब ‘ह्युमन + एआय’ मॉडेलच्या साहाय्याने कंपन्यांना डिजिटल ऑपरेशन्सकडून पूर्णपणे स्वयंचलित उत्पादन यंत्रणेकडे जाण्यासाठी एक प्रत्यक्ष आणि ठोस मार्ग दाखवते.”

 

 

 

आजच्या काळात, बदलत्या तांत्रिक आणि व्यावसायिक गुंतागुंतीशी जुळवून घेत असतानाच, उत्पादन क्षमता वाढवणे आणि प्रक्रियेत लवचिकता राखणे यासाठी कंपन्यांवर सतत दबाव वाढत आहे. ही नवीन लॅब कंपन्यांना ठिकठिकाणी तुकड्या-तुकड्यांमध्ये ऑटोमेशन करण्याऐवजी इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑपरेशन्स या सर्वांचा एकत्रित विचार करण्याची संधी देऊन त्यांची ही गरज पूर्ण करते.

 

 

 

पुण्यातील ही लॅब इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि फॅक्टरी ऑपरेशन्स या क्षेत्रांशी संबंधित एकमेकांशी जोडलेल्या प्रणालींवर लक्ष केंद्रित करते; ज्यामुळे कंपन्यांना नवीन औद्योगिक तंत्रज्ञान आणि मॉडेल्सचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

 

 

ऑटोनॉमस फॅक्टरी संकल्पना: यामध्ये एआयवर आधारित उत्पादन सुधारणा, मशीन कधी खराब होऊ शकते याचा अंदाज लावणे, गुणवत्तेची स्वयंचलित तपासणी आणि अडथळ्यांशिवाय चालणारे कामकाज यांचा समावेश आहे.

डिजिटल ट्विन आणि सिम्युलेशन एन्व्हायर्नमेंट्स: कारखान्यात प्रत्यक्ष तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी, विविध परिस्थितींची पडताळणी करण्यासाठी वर्च्युअल मॉडेल्स आणि चाचणी वातावरण तयार करणे.

व्हिजन एआय, रोबोटिक्स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन: मशीनची समजून घेण्याची क्षमता, परिस्थितीनुसार बदलणारे कामकाज आणि माणूस व मशीनमधील समन्वय वाढवणारे तंत्रज्ञान.

सेन्सर-टू-क्लाउड इंडस्ट्रियल इंटेलिजन्स: प्रत्यक्ष कारखान्यातील सिग्नल्स एज आणि क्लाउड प्लॅटफॉर्मशी जोडणे, जेणेकरून रिअल-टाइम आणि योग्य माहितीवर आधारित निर्णय घेणे शक्य होईल.

सॉफ्टवेअर-डिफाइंड इंजिनिअरिंग: सॉफ्टवेअर, डेटा आणि एआय-आधारित ऑटोमेशनच्या माध्यमातून औद्योगिक यंत्रणांमध्ये सतत सुधारणा आणि विकास करण्यास मदत करणाऱ्या इंजिनिअरिंग क्षमता.

 

 

ही लॅब इंडस्ट्रियल ऑटोनॉमी, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग ट्रान्सफॉर्मेशन्स आणि एआय-आधारित आधुनिक व्यवसाय प्रणाली या क्षेत्रातील टीसीएसच्या सुरू असलेल्या कामाचाच एक भाग आहे. पुण्यातील या सुविधेच्या सुरुवातीसह, टीसीएस कंपन्यांना त्यांची उत्पादने, कारखाने आणि एकूणच कामकाजाचा पुनर्विचार करण्याची संधी देत आहे; ज्याद्वारे अधिक बुद्धिमान, एकमेकांशी जोडलेले आणि शाश्वत भविष्य घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर कंपनी ठाम आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments