संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी सज्ज असताना, इंडिया यामाहा मोटरने राज्यातील ग्राहकांसाठी विशेष सणासुदीच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यामाहाच्या हायब्रिड स्कूटर श्रेणीवर (फसिनो 125 एफआय आणि रेझेडआर 125 एफआय), तसेच एक्सएसआर१५५ आणि एफझेड सिरीजसह मोटरसायकल्सवर आकर्षक विमा लाभ, सुलभ फायनान्स पर्याय आणि मालकी हक्काचे (ओनरशिपचे) विशेष फायदे देऊन नवीन यामाहा घरी आणू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा सणासुदीचा काळ अधिक फायदेशीर बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
विमा लाभ योजना
· यामाहा हायब्रिड स्कूटर श्रेणी (फसिनो 125 एफआय हायब्रिड, रेझेडआर 125 एफआय हायब्रिड आणि रेझेडआर 125 एफआय हायब्रिड स्ट्रीट रॅली): ४,९९९ रुपयांमध्ये विमा, ज्याद्वारे ग्राहकांना २,७०० रुपयांपर्यंतचे* फायदे मिळतील.
· यामाहा एफझेड-एस आणि एफझेड : ३,९९९ रुपयांमध्ये विमा, ज्याद्वारे ग्राहकांना ४,७०० रुपयांपर्यंतचे* फायदे मिळतील.
· यामाहा एक्सएसआर१५५ : ७,५५५ रुपयांमध्ये विमा, ज्याद्वारे ग्राहकांना ६,००० रुपयांपर्यंतचे* फायदे मिळतील.
आकर्षक लो डाउन पेमेंट योजना
· यामाहा हायब्रिड स्कूटर श्रेणी (फसिनो 125 एफआय हायब्रिड , रेझेडआर 125 एफआय हायब्रिड आणि रेझेडआर 125 एफआय हायब्रिड स्ट्रीट रॅली ): डाउन पेमेंट ३,९९९ रुपयांपासून* सुरू.
· यामाहा एफझेड, एफझेड-एस, एफझेड-एक्स आणि एक्सएसआर१५५ : डाउन पेमेंट ६,९९९ रुपयांपासून* सुरू
या मर्यादित कालावधीच्या सणासुदीच्या ऑफर्स संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकृत यामाहा डीलरशिप्सवर उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांना यामाहा मोटरसायकल्स खरेदी करण्याच्या उत्साहासह गणेशोत्सव साजरा करण्याची संधी मिळते.
—


