Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedअलिबाबा चालीस चोर, नारायण पेठेत अवतरणार,जिवंत देखाव्याचे अवतरण 

अलिबाबा चालीस चोर, नारायण पेठेत अवतरणार,जिवंत देखाव्याचे अवतरण 

 

पुणे – शहरात गणेशोत्सव समीप आला असतानाच पहिल्या दिवसापासून देखावे जनतेसाठी खुला करण्याचा अनेक मंडळांचा प्रयत्न सुरू आहे. नारायण पेठेतील मोदी गणपती चौकात भरत मित्र मंडळ यंदा अनोखा देखावा सादर करत आहे. देखावा लोकांसाठी आजच खुला करण्यात आला आहे

खुला जा सिम सिम

दरवर्षी नवनवीन देखावे सादर करण्याची या मंडळाची मोठी परंपरा आहे.या देखाव्याचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखात करण्यात आले या देखाव्याचे उद्घाटन आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक मानकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी महापौर अंकुश काकडे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, प्रसिद्ध सूत्रसंचालक संदीप पाटील अजित दरेकर, मंडळाचे आधारस्तंभ बाळासाहेब.. दाभेकर आदी मान्यवर उपस्थित होते,.

भरत मित्र मंडळाची अनोखी परंपरा आहे. विविध सामाजिक उपक्रम आणि महाशिवरात्र उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो .

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच हा देखावा प्रेक्षकांना खुला झाला आहे. ही नवीन परंपरा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments