पुणे, दि. १७ : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या मान्यतेनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील ऑटोरिक्षांसाठी सुधारित भाडेदर १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत. या अनुषंगाने कॅलिब्रेशन झालेल्या ऑटोरिक्षांच्या मीटर तपासणीचे कामकाज कर्वेनगर येथील अलंकार पोलीस ठाण्यासमोर सुरू आहे.
मीटर तपासणीचे कामकाज सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते १० या वेळेत, तर शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत करण्यात येते. प्रत्येक रविवारी मीटर तपासणीचे कामकाज बंद असते.
दरम्यान, ज्येष्ठ गौरी सणानिमित्त शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर ते रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर नियोजित वेळेनुसार तपासणीचे कामकाज सुरू राहील, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


