पुणे, दि.६: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याजात ५० टक्के सूट देण्याबाबत एकरकमी परतफेड योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू करण्यात आली आहे.
थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीमती आर.एन. माने यांनी केले आहे.
०००


