Monday, October 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedइंडिया स्किल्स स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत १९ ऑक्टोबरपर्यंत वाढविली*

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत १९ ऑक्टोबरपर्यंत वाढविली*

 

 

पुणे, दि. १२ (जिमाका, वृत्तसेवा): भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने आयोजित इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ साठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

देशातील कुशल युवकांना राष्ट्रीय स्तरावर कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार असून, उत्कृष्ट उमेदवारांना पुढे WorldSkills सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 

काही विशिष्ट कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ रोजी किंवा त्यानंतर, तर इतर ५० कौशल्य क्षेत्रांसाठी १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर झालेला असणे आवश्यक आहे. शासकीय व खासगी आयटीआय, सुक्ष्म, लघु व मध्यम, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील पात्र उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी १९ ऑक्टोबर २०२६ पूर्वी Skill India Digital पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. अधिकाधिक पात्र युवकांनी या संधीचा लाभ घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments