Saturday, October 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्गात चुकीच्या आसनव्यवस्थेमुळे ७७ टक्के विद्यार्थी त्रस्त; इंटेरियो बाय गोदरेजचा अहवाल

वर्गात चुकीच्या आसनव्यवस्थेमुळे ७७ टक्के विद्यार्थी त्रस्त; इंटेरियो बाय गोदरेजचा अहवाल

मुंबई, १५ ऑक्टोबर २०२६: गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या इंटरियो बाय गोदरेज या अग्रगण्य फर्निचर ब्रँण्डने नवा अहवाल जाहीर केला आहे. ‘स्क्रीन, सीटिंग एण्ड स्ट्रेन- रिथिंकिंग स्टुडंट हेल्थ थ्रू अर्गोनॉमिक्स’ असे या अहवालाचे नाव आहे. या अभ्यासात डिजिटल साधनांचा वाढता वापर, दीर्घकाळ बसवण्याची सवय, वर्गखोल्यांची रचना आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य यांमधील परस्पर संबंधांचा आढावा घेण्यात आला आहे. देशभरातील १ हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. अभ्यासादरम्यान, विद्यार्थ्यांमधील शारीरिक वेदना, डोळ्यांवरील ताण आणि वाढत्या अकार्यक्षम जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला. यात अर्गोनॉमिकचा फर्निचर आणि अभ्यासासाठी पोषण वातावरण या घटकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ही रचना विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी, अभ्यासातील एकाग्रता वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी ठरते.

 

 

 

या अहवालाबाबत इंटेरियो बाय गोदरेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि बी२बी व्यवसाय प्रमुख समीर जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत मोठा बदल होत आहे. त्यामुळे अभ्यासाच्या भौतिक वातावरणाचा पुनर्विचार करणे आता गरजेचे झाले आहे. सतत बसणे, स्क्रीनचा वाढता वापर आणि जुन्या पद्धतीचे फर्निचर यामुळे विद्यार्थ्यांना शारिरीक त्रास होतो. त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. या अभ्यासातील निष्कर्ष शैक्षणिक संस्थांमध्ये अर्गोनॉमिक्सचे महत्त्व पटवून देतात. शैक्षणिक वातावरण आरामदायी, लवचिक तसेच विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार उपलब्ध असावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. या गरजांच्या पूर्ततेमुळे विद्यार्थ्यांचे शारिरीक स्वास्थ्य चांगले राहिल. त्यांना एकाग्रतेने शिकता येईल.’’

 

 

 

या अहवालातून पारंपरिक वर्गखोल्यांमध्ये चुकीची रचना असल्यास विद्यार्थ्यांना होणा-या शारिरीक त्रासाबद्दलचे भयावह वास्तव मांडण्यात आले आहे. अभ्यासानुसार, वर्गांमधील बसण्याच्या दयनीय व्यवस्थेमुळे तब्बल ७७ टक्के विद्यार्थ्यांना गंभीर स्वरुवातील अस्वस्थता जाणवली. त्यांना शारिरीक वेदनांचाही त्रास उद्भवला. डेस्क व खुर्चीमधील चुकीचे अंतर, गादीचा अभाव आणि अयोग्य उंची यांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येते. दुर्दैवाने आजही ५५ टक्क्याहून जास्त विद्यार्थी हे तासनतास जुन्या पद्धतीच्या लाकडी बाकांवर बसतात. तब्बल ६१ टक्के विद्यार्थ्यांना सततच्या बैठ्या जीवनशैलीला शारिरीक वेदनांचे मुख्य कारण मानले. केवळ ७ टक्के विद्यार्थ्यांनी अयोग्य फर्निचरमुळे शारिरीक वेदना होत असल्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांच्या वाढत्या अकार्यक्षम जीवनशैलीवही चिंता व्यक्त करण्यात आली. ६५ टक्के विद्यार्थी कोणतीही विश्रांती न घेता सलग तासाभराच्या तासिकेला(लेक्चर) उपस्थित राहतात. १५ टक्के विद्यार्थ्यांना सलग २-३ तास वर्गात बसावे लागते. सरासरी रोज किमान चार लेक्चर्स विद्यार्थ्यांना सहा तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून जातो. याशिवाय, ६१.२ टक्के विद्यार्थी दररोज ७ ते ९ तास तर १० टक्के विद्यार्थी १० तासांपेक्षा जास्त काळ अभ्यास करतात. त्यांच्या शारिरीक आरोग्यावरील ताण आणि अकार्यक्षमता धोक्याची लक्षणे दर्शवत आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments