Monday, October 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedइतर राज्यात नोंदणी असलेल्या ४२ वाहनांवर कारवाई; पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष...

इतर राज्यात नोंदणी असलेल्या ४२ वाहनांवर कारवाई; पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष तपासणी मोहीम*

 

 

पुणे, दि. १९ : पिंपरी-चिंचवड परिसरातील इतर राज्यात नोंदणी असलेल्या खाजगी वाहनांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली असून दोषी असलेल्या ४२ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली असून १ ते १९ ऑक्टोबर दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून एकूण ४८ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

परराज्यात नोंदणी असलेल्या खाजगी वाहनधारकांनी महाराष्ट्रात वाहनाचा वापर करताना वाहनाची कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, वैध विमा प्रमाणपत्र, वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र बाळगावे तसेच कलम ४८ नुसार परराज्यातील वाहनाचा नोंदणी क्रमांक बदलण्याच्या प्रक्रियेसाठी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments